कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॉलेज रोडवर कारने घेतली पेट

06:24 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुदैवाने मोठी हानी टळली

Advertisement

बेळगाव :

Advertisement

थांबलेल्या कारने पेट घेतल्यामुळे शनिवारी दुपारी एकच धावपळ उडाली. कॉलेज रोडवर ही घटना घडली असून, या घटनेत सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. गणेशपूर येथील डॉ. संतोष यांच्या मालकीची ती कार आहे. ते सकाळी कारमधून जात होते.

कॉलेज रोडवर ती नादुरुस्त होऊन थांबली. त्यामुळे कार तिथेच उभी करून ते दुसऱ्या वाहनाने आपल्या कामासाठी गेले. दुपारी 1 च्या सुमारास थांबलेल्या कारच्या इंजिनमधून धूर आला. बघता बघता इंजिनने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. कॅम्पचे पोलीस निरीक्षक आनंद वणकुद्री व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आग आटोक्यात आणली. घटना घडली त्यावेळी कारमध्ये कोणीच नव्हते. यासंबंधी कॅम्प पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article