For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धोकादायक ट्रेंड

06:09 AM May 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
धोकादायक ट्रेंड
Advertisement

कॅपुचिनकडून अन्य प्रजातींच्या माकडांच्या पिल्लांचे  अपहरण

Advertisement

पनामाच्या जिकारॉन बेटावर अजब आणि चकित करणारी घटना समोर आली आहे. येथे राहणारे कॅपुचिन माकड हाउलर माकडांच्या नवजात पिल्लांना उचलून स्वत:च्या पाठीवर घेत नेत आहे. हे अजब वर्तन 2022 पासून सुरू झाले आहे. आतापर्यंत कमीतकमी 4 हाउलर माकडांच्या पिल्लांचा मृत्यू झाला आहे. वैज्ञानिक या वर्तनाला ट्रेंड म्हणत आहे, जो कॅपुचिन माकडांच्या समुहात वेगाने फैलावत आहे.

जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टीट्यूट ऑफ अॅनिमल बिहेवियरच्या संशोधकांनी जिकारॉन बेटावर कॅमेरा ट्रॅप लावले होते, जेणेकरून कॅपुचित माकडांच्या अवजारांचा वापर करण्याच्या सवयींचे अध्ययन करता येईल. ही माकडं अत्यंत चतुर असतात आणि दगडांचा हातोड्याप्रमाणे वापर करून फळे तोडत असतात. परंतु 2022 मध्ये कॅमेऱ्यांमध्ये वेगळीच घटना नोंद झाली.

Advertisement

एक युवा नर कॅपुचिन माकडाने एका हाउलर माकडाच्या पिल्लाला पाठीवर बसून नेले. या कॅपुचिन माकडाला संशोधकांनी ‘जोकर’ नाव दिले आहे. जोकरने अनेक महिन्यांपर्यंत चार वेगवेगळ्या हाउलर पिल्लांना स्वत:च्या पाठीवरून नेले, चार अन्य नर कॅपुचिन माकडांनी देखील अशाचप्रकारचे वर्तन केले. एकूण 11 हाउलर पिल्लांना कॅपुचिन माकडांच्या पाठीवर पाहिले गेले.

कॅपुचिन माकड हाउलर माकडांच्या पिल्लांना त्यांच्या आईकडून हिसकावून घेतात, हे सर्व झाडांवर घडते, याचमुळे कॅमेऱ्यात ही प्रक्रिया दिसून आलेली नाही. हाउलर माकड कॅपुचिन माकडांपेक्षा मोठे असतात, याचमुळे ते चपळ नसतात. कॅपुचिन अत्यंत वेगवान अन् चलाख असतात, ज्यामुळे ते सहजपणे हाउलर पिल्लांना नेऊ शकतात.

पिल्लांचे काय होते?

प्रारंभी हाउलर पिल्लं तंदुरुस्त दिसतात, परंतु ती अत्यंत छोटी असतात, त्यांना स्वत:च्या आईच्या दूधाची गरज असते, कॅपुचिन माकड त्यांना दूध पुरवू शकत नाही, याचमुळे पिल्लू हळूहळु कमकुवत होऊ लागते. किमान 4 पिल्लांचा मृत्यू झाल्याची पुष्टी संशोधकांनी दिली आहे. उर्वरित पिल्लू वाचण्याची शक्यताही कमी आहे. काही प्रकरणांमध्ये कॅपुचिन माकड मृत पिल्लांनाही एक दिवसापर्यंत स्वत:च्या पाठीवरून नेताना दिसून आले आहे.

कॅपुचिन असे का वागत आहेत?

कॅपुचिन माकडांकडे करण्यासाठी काहीच नसल्याने ते असे वागत असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. जिकारॉन बेटावर कुठलाच शिकारी नाही. या माकडांना अन्न किंवा सुरक्षेची फारशी चिंता नाही. यामुळे ते कंटाळतात, अजब वर्तन सुरू करतात. हे वर्तन एका ‘फॅशन’प्रमाणे आहे. जे एका माकडापासून सुरू झाले, उर्वरित माकडांमध्ये फैलावत गेल्याचे संशोधक जोए गोल्ड्सबरो यांचे सांगणे आहे. कॅपुचिन माकड अत्यंत जिज्ञासू असतात, दुसऱ्या प्रजातींशी छेडछाड करणे पसंत करतात. हे वर्तन त्यांच्या सामाजिक बंधनाशी देखील संबंधि असू शकते, नर कॅपुचिन स्वत:च्या समुहात मेत्री कायम राखण्यासाठी कधीकधी स्वत:च्या समुहाच्या पिल्लांना उचलून घेत असतात, बहुधा अशाचप्रकारे ते हाउलर पिल्लांना उचलून घेत असतवते, परंतु हाउलर माता स्वत:च्या पिल्लां परत मिळवू शकत नसल्याचे काही वैज्ञानिकांचे मानणे आहे.

हाउलर माकडांसाठी धोका

जिकारॉन बेटावर हाउलर माकड एक संकटग्रस्त प्रजाती आहे, या क्षेत्रात केवळ 4 किंवा 5 हाउलर समूह असल्याचे संशोधकांचे मानणे आहे. अशास्थितीत कॅपुचिन माकड अशाचप्रकारे त्यांच्या पिल्लांना उचलून नेत राहिले तर हाउलर माकडांसाठी हा मोठा धोका ठरू शकतो.

प्रकार कधी थांबणार?

हा अजब ट्रेंड लवकरच संपुष्टात येईल अशी वैज्ञानिकांना अपेक्षा आहे. कॅपुचिन माकडांच्या सवयी काही काळानंतर बदलत असतात. जेव्हा नर माकड स्वत:च्या समुहाला सोडून नव्या समुहात गेल्यावर हे वर्तन थांबू शकते असे मानले जात आहे.

Advertisement
Tags :

.