तिसऱ्या अॅशेससाठी कर्णधार कमिन्सचे पुनरागमन
वृत्तसंस्था/ अॅडेलेड
पुढील आठवड्यात अॅडलेडमध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या अॅशेस कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. पॅट कमिन्स कर्णधार म्हणून परतला असल्याने संघाची गोलंदाजीची बाजू आणखी बळकट झाली आहे. बुधवारी बहुतेक खेळाडूंची निवड करण्यात आली असून 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी निवडकर्त्यांनी त्यांचे पर्याय खुले ठेवले आहेत. कमिन्स आणि नॅथन लिऑन अंतिम अकरामध्ये परतण्याची अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलिया सध्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. अॅशेस राखण्यासाठी अॅडलेड ओव्हलवर त्यांना सामना अनिर्णीत ठेवला तरी पुरेसे ठरणार आहे. जुलैमध्ये ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर 3-0 असा विजय मिळवल्यानंतर कमिन्स खेळलेला नाही. त्यावेळी त्याला पहिल्यांदा पाठीच्या दुखण्यामुळे अॅशेस मालिकेतून बाहेर पडावे लागले होते. दरम्यान गाब्बा येथे झालेल्या कसोटीत आठ विकेट घेत विजयात मोलाची भूमिका बजावल्यानंतरही ऑस्ट्रेलियाच्या संघातून लायनला अचानक वगळण्यात आले. अॅडलेडमध्ये तो संघात परतेल याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे.
उस्मान ख्वाजाभोवती दुसरा प्रश्नचिन्ह आहे. 38 वर्षीय खेळाडूला खात्री आहे की, तो सामन्यापूर्वी वेळेत पाठीच्या दुखापतीतून बरा होईल. परंतु तो टॉप ऑर्डरमध्ये आपले स्थान पुन्हा मिळवेल की नाही हे पहावे लागेल. पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाच्या चौथ्या डावातील धाडसी शतकानंतर, ट्रॅव्हिस हेडने ब्रिस्बेनमध्ये जेक वेदराल्डसोबत 33 आणि 22 धावांची सलामी दिली होती.
तिसऱ्या अॅशेस कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, स्कॉट बोलँड, अॅलेक्स केरी, ब्रेंडन डॉगेट, कॅमेरुन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लीस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मायकेल नीसर, मिशेल स्टार्क, जेक वेदराल्ड, ब्यू वेबस्टर.