For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅपिटल वनतर्फे एकांकिका स्पर्धांना प्रारंभ

10:39 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅपिटल वनतर्फे एकांकिका स्पर्धांना प्रारंभ
Advertisement

पहिल्या दिवशी दर्जेदार एकांकिकांची झलक : लोकमान्य रंगमंदिरमध्ये आयोजन

Advertisement

बेळगाव : कॅपिटल वन संस्थेतर्फे शनिवारपासून आंतरशालेय व आंतरराज्य एकांकिका स्पर्धेला कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी नाट्यारसिकांना दर्जेदार एकांकिकांची झलक पाहावयास मिळाली. संस्थेने आभासी तत्त्वावर निवड प्रक्रिया राबवून संघांची स्पर्धेसाठी निवड केली आहे. सकाळच्या सत्रात एसकेई सोसायटी-ठळकवाडी हायस्कूल यांनी आप्पलपोटे या एकांकिकेतून रस्त्यात कचरा टाकणारे, पत्नीला छळणारे, अस्पृश्यता पाळणारे, झाडे तोडणारे यांना धडा शिकविण्यासाठी शंकर-पार्वती पृथ्वीवर अवतीर्ण होऊन त्यांच्यात सुधारणा करतात. अमृता क्रिएशन बेळगावतर्फे ब्ल्यू व्हेल आणि व्हाईट रोजेस या एकांकिकांतून ब्ल्यू व्हेलच्या खेळाच्या नादाला लागून विद्यार्थी आत्महत्येपर्यंत कसे पोहोचू शकतात, हे दाखवून दिले. मराठी विद्यनिकेतनने ‘आणि झाडे डोलू लागली’ या एकांकिकेतून झाडे कंटाळून आराम बसून राहतात. याचे तोटे आणि त्रास त्यांना जाणवतात आणि पुन्हा ती उठून उभे राहतात, असे उत्साहदायी नाट्या सादर केले.  आंतरराज्य एकांकिका स्पर्धेत अथर्व सांगलीकर एंटरटेन्मेंट आणि मीडिया प्रा. लि. सांगलीतर्फे अत्त दिप भव या एकांकिकेमध्ये कामचुकारपणा, बेफिकीरपणा यामुळे एका आजीला नाहक त्रास होतात. मात्र, ती आपले काम मार्गी लावते हे एकांकिकेतून स्पष्ट झाले. त्यानंतर संगीत-नाट्याक्षेत्र विभाग शिवाजी विद्यालय, कोल्हापूरने ‘लिअर’,  व्रुसेडर्स थिएटर, बेळगाव, ‘सत्य’, निर्मिती नाट्या संस्था-सातारा ‘लेबल’, प्रोसेस इन थिएटर आणि आरपीडी महाविद्यालय-बेळगावने ‘मेड फॉर इच अदर’ या एकांकिका सादर केल्या.

कॅपिटल वन एकांकिकेच्या चषकाचे अनावरण

Advertisement

कॅपिटल वन संघाच्यावतीने आयोजित एकांकिका स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच्या मानाच्या कॅपिटल वन चषकाचे अनावरण स्पर्धेचे परीक्षक तुषार भद्रे, संजय हळदीकर, सचिन धोपेश्वरकर, संस्थेचे चेअरमन शिवाजी हंडे, व्हा. चेअरमन शाम सुतार आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिवाजी हंडे यांनी मागील बारा वर्षांच्या एकांकिका स्पर्धेचा आढावा घेत उद्देश स्पष्ट केला. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी नटराज प्रतिमेचे पूजन करून एकांकिका स्पर्धेला प्रारंभ झाला. याप्रसंगी नाट्यारसिक, स्पर्धक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.