कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंट हस्तांतरण प्रक्रिया केंद्राकडून तूर्तास लांबणीवर

11:22 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॅन्टोन्मेंटमधील बंगलो एरिया देण्यास प्रशासनाचा नकार : हस्तांतरण प्रक्रिया रखडली 

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेत हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सध्या रखडली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डमधील केवळ रहिवासी वसाहती महानगरपालिकेकडे दिल्या जाव्यात. उर्वरित जागा संरक्षण मंत्रालयाकडेच रहावी, अशी भूमिका घेतली आहे. परंतु, याच्याशी राज्य सरकार सहमत नसल्याने हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली आहे. देशभरात एकूण 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. त्यापैकी मागील दोन वर्षात केवळ एकमेव हिमाचल प्रदेश येथील कॅन्टोन्मेंट बोर्डचे स्थानिक महापालिकेमध्ये हस्तांतरण झाले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डचे सर्व कामकाज संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येते. परंतु, संरक्षण मंत्रालयाला रहिवासी वसाहती सांभाळणे कठीण होत असल्याने त्या स्थानिक नगरपंचायती अथवा महानगरपालिकांमध्ये हस्तांतरित केल्या जाणार होत्या.

Advertisement

हस्तांतरणाची प्रक्रिया होणार असल्याने निवडणूक प्रक्रिया बऱ्याच वर्षांपासून थांबविण्यात आली आहे. सध्या निवडणूक नसल्याने सदस्य नाहीत. त्यामुळे सरकारनियुक्त एका सदस्याची निवड कॅन्टोन्मेंटमध्ये करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार लष्करी विभाग आणि रहिवासी वसाहती स्वतंत्र असणे आवश्यक आहे. देशात 62 कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 18 लाख एकर जमीन आहे. त्यापैकी 1.61 लाख एकर जमिनीवर रहिवासी वसाहती आहेत. 62 पैकी 1 कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावमध्ये आहे. सध्या ज्या ज्या राज्यांमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत, तेथील राज्य सरकारकडे हस्तांतरणासाठी अर्ज देण्यात आले आहेत. परंतु, आधीच महानगरपालिकांची अवस्था बिकट असताना त्यात पुन्हा कॅन्टोन्मेंटचा भाग जोडण्यात आल्यास व्यवस्थापन करणे अधिकच किचकट होणार आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंटने हस्तांतरणावेळी खुल्या जागा दिल्यास त्याचा इतर कामांसाठी वापर करून आलेल्या महसुलातून व्यवस्था पुरवणे शक्य होईल, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

कॅन्टोन्मेंट सदस्यांची लवकरच बैठक

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे लवकरच देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सदस्यांची व्यापक बैठक घेणार आहेत. बेळगावमधून सध्या सुधीर तुपेकर हे सरकारनियुक्त सदस्य म्हणून काम करत आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डमधील बंगलो एरिया देण्यास कॅन्टोन्मेंट प्रशासन तयार नसल्यामुळे हस्तांतरणाची प्रक्रिया रखडत चालली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article