महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंट हस्तांतरणाची बैठक अचानक रद्द

11:29 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतरणाबाबत मंगळवारी महत्त्वाची बैठक होणार होती. परंतु लोकसभा अधिवेशनानंतर ही सभा घेण्यात यावी, अशी सूचना संरक्षण मंत्रालयाकडून आल्यामुळे ही बैठक अचानक रद्द झाली. बैठकीची पुढील तारीख अद्याप निश्चित नसली तरी अधिवेशन संपल्यानंतरच बैठक होण्याची शक्यता आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी मंगळवारी ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये दिल्ली, पुणे येथील सदर्न कमांडचे अधिकारी, तसेच कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष, सीईओ व जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार होते. परंतु सोमवारी रात्री उशिरा बैठक पुढे ढकलण्यात आल्याचा संदेश कॅन्टोन्मेंटला मिळाला. त्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article