For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

करचुकव्यांविरुद्ध कॅन्टोन्मेंट करणार कारवाई

11:34 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
करचुकव्यांविरुद्ध कॅन्टोन्मेंट करणार कारवाई
Advertisement

30 जूनपर्यंत मालमत्ताधारकांना मुदत : कर न भरल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील अनेक नागरिकांनी मालमत्ता कर, तसेच पाणीपट्टी भरलेली नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या महसुलावर परिणाम होत आहे. महसूल जमा करण्यासाठी बोर्डने 30 जूनपयर्तिंची मुदत दिली असून त्यापूर्वी कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कॅम्प व किल्ला परिसरात कॅन्टोन्मेंटची हद्द आहे. मागील वर्षापयर्तिं ई-छावणीद्वारे मालमत्ता कर भरणाऱ्यांना कॅन्टोन्मेंट बोर्डकडून 5 टक्के सवलत दिली जात होती. परंतु, यावर्षीपासून ही सवलत बंद करण्यात आली. अनेक मालमत्ताधारकांनी अद्याप त्यांच्या मालमत्तांचा कर भरलेला नाही. घरपट्टी, दुकानाचे भाडे, पाणीपट्टी यासह इतर व्यावसायिक कर भरण्यासाठी 30 जून 2024 पयर्तिंची मुदत देण्यात आली आहे. 30 जूननंतर कॅन्टोन्मेंट बोर्डकडून कारवाईला सुरुवात होणार आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता नळजोडणी तोडली जाणार आहे. कॅन्टोन्मेंट अॅक्ट 2006 नुसार संबंधित मालमत्ताधारकावर कारवाई केली जाणार असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डने स्पष्ट केले आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये अनेक दुकानगाळे व कॅन्टोन्मेंटच्या खुल्या जागा भाडेतत्त्वावर नागरिकांना देण्यात आल्या आहेत. ज्यांनी या मालमत्तांचे कर भरलेले नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

येथे भरा ऑनलाईन कर...

Advertisement

कॅन्टोन्मेंट बोर्डने नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कॅन्टोन्मेंटच्या ई-छावणी वेबसाईटवरून नागरिकांना मालमत्ता कर भरता येतो. त्यामुळे 30 जूनपूर्वी सर्व मालमत्ताधारकांनी कर भरण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Advertisement
Tags :

.