कॅम्प येथील शाळेचे बांधकाम कॅन्टोन्मेंटने थांबवले
11:08 AM Oct 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : कॅम्प येथील एका प्रतिष्ठित इंग्रजी माध्यम शाळेने विनापरवाना बांधकाम सुरू ठेवले होते. याची माहिती मिळताच गुरुवारी कॅन्टोन्मेंटने सदर बांधकाम थांबवले. परवानगी घेतल्यानंतरच बांधकाम सुरू करा, अशी सूचना करण्यात आली. कॅम्पमधील शाळांचा मनमानी कारभार सुरूच आहे. यापूर्वीही अनेकवेळा या शाळांवर कारवाई करण्यात आली होती. बांधकामापूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डची परवानगी घेण्यात आली नसल्याचे काही नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. याची दखल घेऊन गुरुवारी कॅन्टोन्मेंट बोर्डचे बांधकाम विभागाचे अधिकारी शाळेमध्ये पोहोचले. त्यांनी तात्काळ बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले.
Advertisement
Advertisement