कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara : फलटणमध्ये महिला वैद्यकीय अधिकारी आत्महत्या प्रकरणावर कॅन्डल मार्च, दोषींवर फाशीची मागणी

04:05 PM Nov 03, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                 राजकीय आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन न्यायासाठी केले आंदोलन

Advertisement

फलटण : फलटण उपजिल्हा रुग्णालय, येथील महिला वैद्यकीय अधिकारी आत्महत्या प्रकरणी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी शनिवार दि. १ रोजी रात्री फलटणमधील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी गजानन चौक येथे कॅन्डल मार्च काढला. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमलेल्या नागरिकांनी आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देत आत्महत्येच्या घटनेचा निषेध केला.

Advertisement

यावेळी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आ. सचिन पाटील, रामभाऊ ढेकळे, जयकुमार शिंदे, सुधीर अहिवळे, विराज खराडे यांच्यासह विविध राजकीय पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार आणि शहर व पंचक्रोशीतील स्त्री-पुरुष नागरिक सहभागी झाले होते.

या घटनेमुळे फलटणच्या लौकिकाला काळीमा फासला गेला असून, प्रशासकीय उदासीनतेमुळेच एका प्रामाणिक अधिकाऱ्याला जीव गमवावा लागल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी एकमुखाने मागणी करण्यात आली.
ही घटना फलटणसाठी कलंक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नंदकुमार मोरे यांनी केली.

तसेच यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली सावंत, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी बेडके, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रतिभा शिंदे, गिरीश बनकर, किशोर देशपांडे आदींनी घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.

Advertisement
Tags :
#CandleMarch#JusticeForDoctor#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaCitizenDemonstrationFaltanProtestSocialActivism
Next Article