महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कँडिडेट्स बुद्धिबळ : प्रज्ञानंद, गुकेश, वैशालीचे सामने बरोबरीत

06:38 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ टॉरंटो

Advertisement

सध्या येथे खेळविण्यात येत असलेल्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने फ्रान्सच्या फिरोझा अलिरेझाविऊद्धचा सामना बरोबरीत सोडवला. पण त्याच्या आधी काही तणावपूर्ण क्षणांचा सामना करावा लागला. दुसरीकडे, डी. गुकेशही विदित गुजराथीविऊद्ध फारसे काही करू शकला नाही आणि त्यालाही बरोबरीवर समाधान मानावे लागले.

Advertisement

कँडिडेट्स स्पर्धेस शांत पद्धतीने सुरुवात करून देणारी ही फेरी राहिली. कारण पुऊष विभागातील सर्व चार लढती अनिर्णीत अवस्थेत संपुष्टात आल्या, तर महिलांच्या स्पर्धेत झोंगी टॅनने तिच्याच देशाच्या टिंगजी लेईला पराभूत करून पहिला विजय नोंदविला. उर्वरित तीन सामने अनिर्णित राहिले.

भारताच्या आर. वैशालीने आपल्याच देशाच्या कोनेरू हम्पीशी बरोबरी साधली. रशियन अॅलेक्झांड्रा गोर्याचकिना आणि कॅटेरिना लाग्नो यांच्यातील सामनाही बरोबरीत सुटला, तर सर्वांत खालच्या क्रमांकावर असलेली आणि स्पर्धेतील एकमेव ग्रँडमास्टर नसलेली खेळाडू बल्गेरियाची नुरग्युल सलीमोव्हाने अॅना मुझिचूकला बरोबरीत रोखून चांगली सुऊवात केली.

पुऊषांच्या विभागात फॅबियानो काऊआना आणि हिकारू नाकामुरा या दोन अमेरिकन खेळाडूंमधली लढतही बरोबरीत संपली, तर अझरबैजानच्या निजात आबासोव्हने रशियाच्या इयान नेपोम्नियाचीविऊद्ध सहज बरोबरी साधून चांगल्या प्रकारे सुऊवात केली.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article