For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जन्मदिवस सिद्ध करण्यासाठी ‘आधार’ कार्डाची मान्यता रद्द : ईपीएफओ

07:00 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
जन्मदिवस सिद्ध करण्यासाठी ‘आधार’ कार्डाची मान्यता रद्द   ईपीएफओ
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेकडून (ईपीएफओ) जन्मदिवस सिद्ध करण्यासाठी आधार कार्डाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे जन्मदिवसाचा पुरावा म्हणून आधार कार्डाचा उपयोग करता येणार नाही. आधार कार्ड हे केवळ त्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आहे. ते जन्मदिवसाचा आधार ठरु शकत नाही, असे संस्थेकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले आहे. या संस्थेच्या वतीने 16 जानेवारीलाच एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार आधार कार्डाची जन्मदिवसाचा पुरावा म्हणून यापूर्वी असणारी मान्यता काढून घेण्यात आली आहे. तसेच जन्मदिवस सिद्ध करणाऱ्या मान्यताप्राप्त कागदपत्रांच्या सूचीतून आधार कार्डाला वगळण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे कोणती ?

Advertisement

दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे दर्शविणारी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र, सरकारी शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाने दिलेली गुणपत्रिका (मार्कलिस्ट), शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्स्फर सर्टिफिकेट, सिव्हिल सर्जनने दिलेले, ज्यावर जन्मदिनांक आहे असे प्रमाणपत्र, पारपत्र (पासपोर्ट), पॅन कार्ड, वास्तव्य प्रमाणपत्र (डोमिसाईल सर्टिफिकेट) आणि निवृत्तीवेतन प्रमाणपत्र (पेन्शन सर्टिफिकेट) ही कागदपत्रे जन्मदिनांक सिद्ध करण्यासाठी मान्य होणार आहेत.

Advertisement
Tags :

.