For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘एलईडी’ मासेमारीची परवानगी रद्द करा, अन्यथा राजीनामे द्या

12:32 PM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘एलईडी’ मासेमारीची परवानगी रद्द करा  अन्यथा राजीनामे द्या
Advertisement

मच्छीमारमंत्री, संचालिका यांच्याकडे मच्छीमारांची मागणी : ‘गोंयचो रापणकार संघटने’कडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

Advertisement

पणजी : राज्यातील पारंपरिक मच्छीमार हे उदरनिर्वाहासाठी किनाऱ्यावरच अवलंबून आहेत. सध्या मच्छीमार बांधवांपुढे अनेक अडचणी आहेत. त्या अडचणी सोडविण्याचे सोडून मच्छीमार खात्याने एलईडी मासेमारीसाठी दिलेली परवानगी पूर्णपणे चुकीची आहे, अशी तीव्र नाराजी व्यक्त करुन एलईडी मासेमारीला दिलेली परवानगी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी गोंयचो रापणकार संघटनेच्या नेत्यांनी केली आहे. मत्स्य व्यवसायमंत्री नीळकंठ हळर्णकर,संचालिका शमिला मोंतेरो यांनी एलईडी मासेमारीला दिलेली परवानगी स्थानिक मच्छीमार बांधवांच्या पोटावर पाय आणणार आहे. त्यामुळे हळर्णकर, मोंतेरो यांनी ही परवानगी रद्द करावी, अन्यथा राजीनामे द्यावेत, अशी मागणी गोंयचो रापणकार संघटनेने केली आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या अनुदान आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांकडे दुर्लक्ष करून नॉर्वे येथे सहलीवर गेलेले मंत्री हळर्णकर, त्यांचे ओएसडी प्रथमेश तुळसकर व संचालिका शमिला मोंतेरो यांनी लाखो ऊपये खर्च केल्याबद्दलही संघटनेने टीका केली आहे. एलईडीबाबत उच्च न्यायालयात प्रकरण सुरु असूनही एलईडी मासेमारीला परवानगी दिल्याबद्दल मंत्री, संचालकांना राजीनामा द्यावाच लागेल, असा इशारा गोंयचो रापणकार एकवोट संघटनेने दिला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.