कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅनडाचे पंतप्रधान अमेरिकेला भेट देणार

06:55 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विजयानंतर कार्नी यांचा हा पहिलाच परदेश दौरा

Advertisement

वृत्तसंस्था/ ओटावा

Advertisement

कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी पुढील आठवड्यात अमेरिकेला भेट देणार आहेत. कार्नी 6 मे रोजी अमेरिकेला रवाना होतील, अशी माहिती शनिवारी पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आली. या दौऱ्यात ते व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही भेटणार आहेत. दोन्ही देशांमध्ये टॅरिफवरून तणाव वाढत असतानाच ट्रम्प आणि कार्नी यांच्यातील द्विपक्षीय बैठकीत महत्त्वाची चर्चा होणार आहे.

कॅनडामधील कार्नी यांच्या विजयाला ट्रम्पच्या विरोधाशीही जोडले जात आहे. आम्ही आमच्या सरकारांचे प्रमुख म्हणून भेटत आहोत, असेच ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीबाबत कार्नी यांनी स्पष्ट केले आहे. तीन दिवसांपूर्वी निवडणूक जिंकल्यानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात कार्नी यांनी कॅनडाचे अमेरिकेशी असलेले संबंध संपुष्टात आणल्याची घोषणा केली. अमेरिकेने आमचा विश्वासघात केला असून कॅनडा हे कधीही विसरणार नाही, असे कार्नी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे.

कॅनडामध्ये संसदेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा सत्ताधारी लिबरल पक्षाला जनतेचा कौल मिळाला आहे. सलग चौथ्या वेळेला कॅनडात लिबरल पक्षाचे सरकार स्थापन झाले आहे. या निवडणुकीत प्रथमपासूनच या पक्षाची अवस्था योग्य नव्हती. मात्र, या पक्षाला अनपेक्षित विजय मिळाला आहे. कर्नी यांच्यापूर्वी कॅनडाचे नेते जस्टीन ट्रूडो हे होते. त्यांच्या काळात भारताच्या आणि कॅनडाच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. कर्नी यांच्याकडे कॅनडाची सूत्रे आल्यापासून त्यांनी भारताशी संबंध सुधारण्याची भाषा केली आहे. भारताशी घनिष्ट संबंध हा कॅनडाच्या धोरणाचा प्रमुख भाग आहे, असे त्यांनी विजयी झाल्यानंतरही स्पष्ट केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे नेते मार्क कर्नी यांचे विजयासाठी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article