महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कॅनडाचा इराणला झटका,रिव्होल्युशनरी गार्ड कोरवर बंदी

07:00 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ओटावा : कॅनडातील जस्टिन ट्रुडो सरकारने इराणच्या सशस्त्र दलांची शाखा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोरला (आयआरजीसी) दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डोमिनिक लेब्लांक यांनी आयआरजीसीच्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी स्वत:कडे उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा वापर कॅनडा करणार असल्याची घोषणा केली आहे. आयआरजीसीच्या वरिष्ठ सदस्यांसोबत इराणच्या हजारो अधिकाऱ्यांना आता कॅनडात प्रवेश करता येणार नाही. तर कॅनडात यापूर्वीच राहत असलेल्या इराणी अधिकाऱ्यांची चौकशी केली जाऊ शकते तसेच त्यांची देशातून हकालपट्टी केली जाऊ शकते अशी माहिती ब्लांक यांनी दिली आहे. या घोषणेच्या परिणामादाखल कॅनडातील वित्तीय संस्था म्हणजेच बँका आणि ब्रोकरेजला दहशतवादी संघटनेची संपत्ती त्वरित गोठवावी लागणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article