महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅनडास्थित गँगस्टर लखबीर दहशतवादी घोषित

06:25 AM Dec 31, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

Advertisement

कॅनडास्थित पंजाबचा खतरनाक गँगस्टर लखबीरसिंग उर्फ लांडा याला केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केले आहे. लांडा हा खलिस्तानी दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी (बीकेआय) संबंधित असल्याची पुष्टी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 33 वर्षीय गँगस्टर लांडाने 2021 मध्ये मोहाली येथील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट हल्ल्याची योजना आखली होती. याशिवाय इतर अनेक दहशतवादी कारवायांमध्येही त्याचा सहभाग आहे. पंजाबमधील तरनतारन जिह्यातील रहिवासी असलेली लांडा 2017 मध्ये कॅनडाला पळून गेला होता. तो पाकिस्तानस्थित गँगस्टर हरविंदर सिंग उर्फ रिंडा याच्या जवळचा मानला जातो.

Advertisement

लखबीरसिंग सध्या कॅनडात बसून बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंध ठेऊन भारताविरुद्ध कारवाया करत असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत. आता भारत सरकारच्या गृह विभागाने त्याला दहशतवादी घोषित केले आहे. लखबीरसिंग लांडा हा मूळचा पंजाबचा रहिवासी असून तो गेल्या काही वर्षांपासून कॅनडामध्ये राहत आहे. तो 2017 मध्ये कॅनडाला पळून गेला असून त्याच्यावर 18 गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच पंजाब पोलिसांनी कॅनडास्थित दहशतवाद्याच्या जवळच्या साथीदारांशी संबंधित 48 ठिकाणांवर छापे टाकले होते. एका व्यावसायिकावर दोन हल्लेखोरांनी हल्ला केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. छापेमारीनंतर काही जणांना अटकही करण्यात आली होती

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article