For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महायुतीतर्फे नारायण राणेंच्या प्रचाराचा कणकवलीत शुभारंभ

12:41 PM Apr 21, 2024 IST | अनुजा कुडतरकर
महायुतीतर्फे नारायण राणेंच्या प्रचाराचा कणकवलीत शुभारंभ
Advertisement

कणकवली / वीरेंद्र चिंदरकर

Advertisement

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, भाजपचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कणकवली शहरातील प्रचाराचा शुभारंभ रविवारी श्री देव स्वयंभू मंदिरात करण्यात आला. यावेळी प्रचाराचा नारळ फोडून मताधिक्य मिळण्यासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. त्यानंतर मंदिर परिसरात राणेंच्या विजयासाठी घोषणाही देण्यात आल्या. यावेळी भाजपा व मित्रपक्षांचे कार्यकर्ते , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचार शुभारंभप्रसंगी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा शहर अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, किशोर राणे, बाबू गायकवाड, अभिजीत मुसळे, राजश्री धुमाळे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, कविता राणे, मेघा सावंत, चारुदत्त साटम तसेच गंगाधर सावंत, संजना सदडेकर, संजिवनी पवार, सुशिल पारकर, महेश सावंत, पंकज पेडणेकर, मंदार कोदे, नंदू वाळके, राजा पाटकर, बाळा सावंत, सचिन कुवळेकर आदी उपस्थित होते.

Advertisement

७ मे रोजी होणाऱ्या लोकशाहीच्या महामहोत्सवात महायुतीचे उमेदवार, माजी मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना शहरातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपासह घटक पक्षांचे महायुतीचे पदाधिकारी उत्साहात कामाला लागले आहेत. कणकवली शहराचा प्रचाराचा आज शुभारंभ होत असून शुभारंभाच्या दिवशीच शहरातील पाच वार्डमध्ये प्रचाराचे नियोजनही करण्यात आले आहे. शहरातून राणेंना मताधिक्य मिळणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, अशी प्रतिक्रिया समीर नलावडे व बंडू हर्णे यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.