कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅम्पचे पोलीस निरीक्षक निलंबित

12:27 PM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेस मेळाव्यातील भाजप महिला कार्यकर्त्यांच्या राड्याचा परिणाम

Advertisement

बेळगाव : सीपीएड मैदानावर  झालेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती. याचवेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांचा रागही अनावर झाला होता. आता याच प्रकरणात कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बुधवारी 7 मे रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी आतापर्यंत तिघा जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. खडेबाजारचे बी. ए. नौकुडी व कॅम्पचे मल्लाप्पा हडगीनहाळ यांना कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी निलंबित करण्यात आले होते.

Advertisement

28 एप्रिल रोजी सीपीएड् मैदानावर काँग्रेसचा मेळावा झाला होता. केंद्र सरकारने केलेल्या दरवाढीविरुद्ध व संविधान बचावसाठी हा मेळावा होता. मेळाव्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी केली होती. या घटनेनंतर पोलीस यंत्रणेवर मुख्यमंत्री पार भडकले होते. याचवेळी धारवाडचे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख एन. व्ही. बरमणी यांच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न झाला होता. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पोलीस दलाकडून बंदोबस्त करताना कोणत्या चुका झाल्या आहेत? याची चौकशी करून अहवाल मागितला होता. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत दोन हवालदार व एका पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article