कॅम्प पोलिसांकडून चौघा जुगाऱ्यांना अटक
12:59 PM Oct 21, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : कॅम्प हाजपीर रोडवर जुगार खेळणाऱ्या चौघांना रविवार दि. 19 रोजी कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. अजय अर्जुन लाखे, राहणार शिवाजीनगर, मंगेश बाबू डावाळे, राम देमानाथ लाखे, युवराज सुंदर लाखे तिघेही राहणार ज्योतीनगर, गणेशपूर अशी त्यांची नावे असून, त्यांच्याकडून 1680 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. कॅम्प पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या हाजपीर रोडवर सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळला जात आहे, अशी माहिती कॅम्पच्या पोलीस उपनिरीक्षक रुक्मिणी ए. यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकून वरील चौघा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article