महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘गृहलक्ष्मी’तील तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी उद्यापासून शिबिर

06:27 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रामपंचायत पातळीवर तीन दिवस आयोजन : मंत्री प्रियांक खर्गे यांची माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेतील तांत्रिक समस्या घटनास्थळीच दूर करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यालयात 27 ते 29 डिसेंबरपर्यंत तीन दिवस विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामविकास, पंचायतराज आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे यांनी दिली.

आधार लिंक, बँक संबंधित समस्या, ई-केवायसी अपडेट, नवीन बँक खाती उघडणे आदी अनेक समस्यांमुळे गृहलक्ष्मी योजनेंतर्गत राज्यातील अनेक महिलांना  अडचणी येत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यासह गृहलक्ष्मी योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तीन दिवस पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली या शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. बापूजी सेवा केंद्रातील संगणक परिचालक, अंगणवाडी सेविका आणि इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी ऑफ सिटिझन सर्व्हिसेस (ईडीसी) पथक या शिबिरात सहभागी होणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक व इतर बँकांचे प्रतिनिधी शिबिरात सहभागी होऊन त्यांना मदत करतील. गृहलक्ष्मी योजनेशी संबंधित सर्व तांत्रिक व बँकेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या गृहलक्ष्मी लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री प्रियांक खर्गे यांनी  केले आहे.

गृहलक्ष्मी लाभार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी बँक खाती उघडणे आणि आधार लिंक करणे, ई-केवायसी अपडेट, गृहलक्ष्मी अर्जाचे स्टेटस व्हेरिफिकेशन आदी समस्यांची जागेवरच तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालयात 27 ते 29 डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी 9 ते 5 पर्यंत सदर शिबिर होणार आहे. गृहलक्ष्मी योजनेचा लाभ मिळताना समस्यांना सामोरे जात असलेल्या लाभार्थ्यांनी शिबिरात येताना स्वत:चे व पतीचे आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक घेऊन यावे. महिला व बालकल्याण खात्याच्या क्षेत्रस्तरीय कर्मचाऱ्यांनी गृहलक्ष्मी योजनेच्या लाभार्थ्यांना याची माहिती देऊन त्यांना शिबिरात बोलावून आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच एसएमएसही पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही मंत्र्यांनी दिली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article