For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कॉल मी बे’चा ट्रेलर जारी

06:53 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘कॉल मी बे’चा ट्रेलर जारी
Advertisement

अनन्या पांडे मुख्य भूमिकेत

Advertisement

अनन्या पांडेची सीरिज ‘कॉल मी बे’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये बेला सुपर लक्झरी लाइफ जगत असताना तिच्या आयुष्यात असे वळण येते की तिला सर्वसामान्यांप्रमाणे जगावे लागते असे दाखविण्यात आले आहे. बेलाच्या आयुष्यात होणाऱ्या चुका आणि समस्या या सीरिजमध्ये दाखविण्यात आल्या आहेत.

अनन्या पांडेचा या सीरिजमधील कलाकार म्हणून वावर लक्ष वेधून घेत आहे. या सीरिजमध्ये अनन्यासोबत वीर दास, गुरफतेह पीरजादा, विहान समत, मुस्कान जाफरी, निहारिका लायरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनी माथूर हे कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement

कॉल मी बे ही सीरिज 6 सप्टेंबर रोजी अमेझान प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन कोलिन डी कुन्हा यांनी केले आहे. अनन्या याचबरोबर आगामी काळात ‘सीटीआरएल’ आणि ‘शंकरा’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. अनन्या सध्या स्वत:च्या रिलेशनशिपवरून चर्चेत आहे. एका मॉडेलला ती डेट करत असल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Tags :

.