For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॉल शुल्क झाले महाग, जिओपाठोपाठ एअरटेलने वाढवले शुल्क

06:00 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॉल शुल्क झाले महाग  जिओपाठोपाठ एअरटेलने वाढवले शुल्क
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

मोबाईलवरून कॉल करणे यापुढे महाग होणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओ यांनी आपल्या शुल्कामध्ये वाढ केलेली आहे. या पाठोपाठ आणखी एक दूरसंचार कंपनी भारती एअरटेलनेदेखील आपल्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. दोन्ही कंपन्यांनी जवळपास 21 टक्क्यांपर्यंत शुल्कामध्ये वाढ केल्याचे सांगितले जात आहे.

एअरटेलने मोबाईल कॉल दरामध्ये 10 ते 21 टक्के इतकी वाढ केलेली आहे. रिचार्ज शुल्कामध्ये वाढ आगामी 3 जुलै 2024 पासून लागू केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारती एअरटेलच्या नव्या दरवाढीनुसार 199 रुपये (179 पूर्वीचा दर), 509 रुपये (455 पूर्वीचा दर) आणि 1999 रुपये (1799 पूर्वीचा दर) अशाप्रकारे आता नवे दर असणार आहेत. रोजच्या फोन वापरकर्त्यासाठी 479 रुपयांचा प्लान आता 579 रुपयांवर पोहोचला आहे. जवळपास 20 टक्के इतकी वाढ कॉलदरात कंपनीने केली आहे. याचप्रकारे रिलायन्स जिओनेदेखील आपल्या रिचार्ज शुल्कामध्ये 12 ते  25 टक्क्यांपर्यंत वाढ केलेली आहे. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्ये कॉलदरामध्ये 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली.

Advertisement

रिलायन्स व एअरटेल या दोन्ही कंपन्या 5 जी सेवा भारतामध्ये देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. 2024-25 आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीत जिओने 108 दशलक्ष 5जी ग्राहक आपल्या खात्यामध्ये जोडले आहेत. तर या तुलनेमध्ये स्पर्धक कंपनी भारती एअरटेल यांनी 72 दशलक्ष 5जी ग्राहक जोडले आहेत.

काय म्हणाले आकाश अंबानी

रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आणि मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश यांनी सांगितले की, नव्या योजनांच्या शुभारंभासह कल्पकतेला वाव देण्यासाठी कंपनी आगामी काळामध्ये प्रयत्न करणार आहे. आमच्या ग्राहकांना 5 जी सेवा अधिक उत्तम प्रकारे देण्यासोबतच पर्यावरणाप्रती काळजी घेण्याची खबरदारीदेखील सोबत कंपनी घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.