कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘त्या’ प्रकरणातील सी. टी. रवी यांची याचिका फेटाळली

06:22 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

मागील वर्षी डिसेंबरमध्ये बेळगाव विधिमंडळ अधिवेशनात भाजपचे विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांनी महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविषयी अपशब्द वापरून अवमान केल्याचा आरोप आहे. यासंबंधी आपल्याविरोधात दाखल झालेला खटला रद्द करावा, विनंती करणारी सी. टी. रवी यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपचे विधानपरिषद सदस्य सी. टी. रवी यांच्यावर आहे. आपल्याविरोधात दाखल झालेला खटला रद्द करावा, अशी याचिका सी. टी. रवी यांनी दाखल केली होती. त्यावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने 14 फेब्रुवारी रोजी निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी निकाल देताना न्यायालयाने रवी यांच्याविरुद्धचा खटला रद्द करण्यास नकार दिला. तसेच तक्रारदार महिलेविरुद्ध कथित शब्द उच्चारला गेला असेल किंवा आक्षेपार्ह हावभाव केला असेल तर महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो. याचा सभागृहाच्या कामकाजाशी किंवा व्यवहाराशी कोणताही संबंध असू शकत नाही. त्यामुळे ही बाब सभागृहाच्या अधीन नाही, असे मत व्यक्त करत न्यायमूर्ती एम. नागप्रसन्न यांनी रवी यांची याचिका फेटाळून लावली.

Advertisement
Next Article