For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

7 राज्यात 13 विधानसभा जागांवर 10 जुलै रोजी पोटनिवडणूक

06:07 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
7 राज्यात 13 विधानसभा जागांवर 10 जुलै रोजी पोटनिवडणूक
Advertisement

13 जुलै रोजी मतमोजणी होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी  दिल्ली

निवडणूक आयोगाने सोमवारी सात राज्यांमधील 13 विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील 1, मध्यप्रदेशातील 1, उत्तराखंडमधील 2, पंजाबमधील 1, हिमाचल प्रदेशमधील 3, बिहारमधील 1 आणि पश्चिम बंगालमधील 4 जागांवर 10 जुलैला मतदान होणार आहे. या पोटनिवडणुका एकतर सदस्याच्या मृत्यूमुळे किंवा विद्यमान सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर होणार आहेत.

Advertisement

रुपौली (बिहार), रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि माणिकतला (सर्व पश्चिम बंगाल), विक्रवंडी (तामिळनाडू), अमरवारा (मध्यप्रदेश), बद्रीनाथ आणि मंगळैर (उत्तराखंड), जालंधर पश्चिम (पंजाब) याबरोबरच हिमाचल प्रदेशमधील देहरा, हमीरपूर आणि नालागढ या विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.

निवडणुकीची अधिसूचना 14 जून रोजी जारी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 21 जून असून अर्जांची छाननी 24 जून रोजी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 जून आहे. 10 जुलै रोजी मतदान होणार असून मतमोजणी 13 जुलै रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने 15 जुलैपूर्वी पोटनिवडणूक पूर्ण करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.