महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झोपेत लाखो रुपयांची खरेदी

06:22 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खरेदी-विक्री किंवा कोणताही व्यवहार करताना आपण पूर्णपणे जागृतावस्थेत असले पाहिजे, असा नियम आहे. चित्त टाळ्यावर नसेल तर फसवणूक होऊन हानी होण्याची शक्यता निश्चित असते. महिला या पुरुषांपेक्षा अधिक जागरुक असतात असे मानले जाते. त्यामुळे नित्योपयोगी वस्तूंच्या खरेदीचे उत्तरदायित्व प्रामुख्याने त्यांचे असते. भाजी असो वा साडी, ती नीट पारखून घेण्यात त्यांचा हातखंडा असतो. तथापि, इंग्लंडमध्ये एक महिला अशी आहे की जी, चक्क झोपेत शॉपिंग करते. अगदी लाखो रुपयांच्या वस्तू ती झोपेतच विकत घेते.

Advertisement

ही महिला 42 वर्षांची असून तिचे नाव केली नाईप्स असे आहे. झोपेत असताना खरेदी हे तिचे वैशिष्ट्या आहे. ती असे का करते, हा साऱ्यांना पडणारा प्रश्न आहे. पण तिचाही नाईलाज असल्याचे दिसून येते. कारण तिला एक अत्यंत दुर्मिळ असा शारिरीक विकार असून त्यामुळे ती असे करते. पण झोपेत ती शॉपिंग करते तरी कशी असा प्रश्न अनेकजण विचारतात. तर ती बाजारात जाऊन खरेदी करत नाही. घरीच झोपल्या झोपल्या ऑनलाईन शॉपिंग करते. आतापर्यंत तिने अशा प्रकारे लाखो रुपयांची खरेदी केली आहे. तिला स्वत:लाही तिच्या या सवयीची किंवा व्याधीची चिंता वाटते. कारण झोपेतच ती आपल्या कार्डावरुन ऑन लाईन खरेदी करत असल्याने नेमका किती पैसा आपण खर्च करीत आहोत, हे तिला कळत नाही. तसेच कित्येकदा घरात असलेल्या वस्तूंचीच पुन्हा खरेदी केली जाते. त्यामुळे पैसा वाया जाण्याचाही धोका असतोच. पण तिला तिच्या व्याधीमुळे झोपेतील खरेदीवर नियंत्रण ठेवता येत नाही, असे तिचे म्हणणे आहे.

Advertisement

झोपेत ती काहीही खरेदी करु शकते. एकदा तिने संपूर्ण बास्केटबॉल सामग्री खरेदी करण्याची ऑर्डर दिली होती. तिचे आणखी एक वेशिष्ट्या असे की ऑन लाईन ऑर्डर देऊन खरेदी केलेले सामान घरी आले, ती तिला झोपेतून जाग येते आणि आपण काय खरेदी केली आहे, हे त्यावेळी तिला समजते. एकंदर ही अजब महिला सध्या जगात चर्चेचा विषय बनली आहे. तिला असलेला विकार अत्यंत दुर्मिळ असून तो काही कोटी लोकांमधून एखाद्यालाच असतो, अशी स्थिती आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article