For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्लॅट विकून पूर्ण गावाची खरेदी

06:16 AM Apr 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
फ्लॅट विकून पूर्ण गावाची खरेदी
Advertisement

जोडप्याला शहर झालंय नकोसं

Advertisement

धावपळयुक्त जीवनाला वैतागलेले लोक पुन्हा एकदा गावाच्या दिशेने धाव घेत आहेत.  कधी सुविधांच्या नादात लोक शहरांच्या दिशेने धाव घ्यायचे, परंतु आता शांतता आणि समाधानाच्या शोधात ग्रामीण भागांमध्ये परतत आहेत. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका दांपत्याने देखील असेच केले आहे. त्यांनी मँचेस्टर सारख्या ठिकाणावरील स्वत:चा तीन बेडरुमचा फ्लॅट विकून गावात स्थलांतर केले आहे.

47 वर्षीय लिज मर्फी आणि त्यांचे 56 वर्षीय पती डेव्हिड यांनी स्वत:चा फ्लॅट विकला आणि याच्या पैशातून एक पूर्ण गावच खरेदी केले. आता ते येथे बकऱ्या आणि कोंबड्या पाळत असून परत कधीच शहराचे तोंडही त्यांना पहायचे नाही. भले आमची कमाई कमी असली तरीही येथे मिळणारे समाधान पाहता मागे वळून पाहू इच्छित नसल्याचे त्यांचे सांगणे आहे.

Advertisement

फ्रान्समधील गाव

दांपत्याने जानेवारी 2021 मध्ये दक्षिण-पश्चिम फ्रान्समध्ये लेक डी मॅसनचे ऐतिहासिक गाव खरेदी पेल. याकरता त्यांनी ब्रिटनमधील मँचेस्टर येथील स्वत:चा तीन बेडरुमचा फ्लॅट विकला. यातून मिळालेल्या रकमेचा वापर त्यांनी 400 वर्षे जुनी 6 घरं, दोन शेतजमिनी आणि तीन एकर जमीन खरेदी करण्यासाठी केला. त्यांनी या ठिकाणाला एका शांत व्यावसायिक जागेत बदलले आहे. दांपत्याच्या प्रकल्पानंतर त्यांचे आईवडिल देखील येथेच रहायला आले असून ते देखील परतू इच्छित नाहीत.

पाळीव प्राणी

कधी रेडिओ स्टेशनवर काम करणाऱ्या या दांपत्याने स्वत:च्या गावातील तीन घरांना हॉलिडे होममध्ये बदलले आहे. एकूण 19 लोकांची क्षमता असलेल्या या घरांवर सोलर पॅनल लावले जात आहेत. ब्रिटनमध्ये आम्ही जितके पैसे कमावत होतो, तितकी आता कमाई होत नाही, परंतु आमच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारली आहे. आमच्यावरील ताण कमी झाला असल्याचे त्यांचे सांगणे आहे. परिवाराने तीन बकऱ्या, कोंबड्या आणि मांजरांना पाळले असून आता ते समाधानाचे जीवन जगत आहेत.

Advertisement
Tags :

.