21 लाखात चालता-फिरता ‘महाल’ खरेदी
सद्यकाळात घरखरेदी करणे अत्यंत अवघड ठरले आहे. भारतातही फ्लॅट्सचे दर गगनाला भिडू लागले आहेत. तर ब्रिटनसारख्या देशांमध्ये तर ही समस्या अधिकच तीव्र आहे. डिसेंबर 2024 मध्ये ब्रिटनमध्ये घराची सरासरी किंमत 3 कोटी होती. अशास्थितीत काही लोकांनी वेगळा विचार करत स्वत:साठी असे घर तयार केले आहे, जे इतरांनाही आवडू लागले आहे. 38 वर्षीय लिंडजीने घर खरेदी करण्याऐवजी केवळ 21 लाख रुपयांमध्ये डबल-डेकर बस खरेदी केली आणि त्यालाच चालते-फिरते घर करून टाकले. आता ती या अनोख्या घरात राहण्यासोबत ब्रिटनमध्ये फिरत आहे. याच्या आतील दृश्य पाहून थक्क व्हायला होते.
बालपणी बसचालक होण्याचे माझे अजब स्वप्न होते. स्वत:चे घर विकल्यावर मी एक डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. बसमध्ये राहण्याची माझी विचित्र कल्पना होती. कुठल्याही अनुभवाशिवाय मी या विशाल बसचे नुतनीकरण करण्याचे भरभक्कम काम सुरू केले. हा प्रकल्प प्रत्यक्षात रक्त, घाम आणि अश्रूंनी भरलेला राहिला असल्याचे ती सांगते. बसचे नुतनीकरण करण्यासाठी लिंडजीने पूर्ण वर्ष काम केले आणि 50 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च पेली, यात सोलर पॅनेल्स आणि स्टोवसारख्या सुविधा सामील आहेत. बसचा वरील हिस्सा तिचे घर आहे, तर खालील हिस्सा एक कम्युनिटी स्पेस आणि मोफत बुक स्वॅप लायब्ररीच्या स्वरुपात काम करतो. मी या बसला फेस्टिव्हल्समध्ये नेत त्या भागांमध्ये साक्षरता वाढवू इच्छिते. हे लोकांना जोडण्याचे एक साधन असल्याचे ती सांगते.
बसला सजविण्यासाठी तिने होमली टच दिला, यात स्टोव आणि आरामदायी इंटीरियर्स सामील असून मे महिन्यात लिंडजीने एमओटी (मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट) पास केली, ज्यानंतर तिने बसला फेस्टिव्हल्समध्ये नेण्यास सुरुवात केली. पहिला फेस्टिव्हल 21 जुनला होता, परंतु याकरता लिंडजीला कॅटेगरी डी ड्रायव्हिंग लायसेन्स मिळवावे लागले. कारण डबल डेकर बस चालविण्यासाठी सामान्य कार लायसन्स पुरेसे नाही. कॅटेगरी डी लायसेन्स डबल डेकर, सिंगल डेकर आणि बेंडी बस चालविण्याची अनुमती देते. या अनोख्या लाइफस्टाइलमध्ये लिंडजीसाठी इंधनाचा खर्च मोठे आव्हान आहे. 150 मैलासाठी तिला जवळपास 10,700 रुपये खर्च येतो.
