For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बटलरची ‘जोश’पूर्ण खेळी

06:50 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
बटलरची ‘जोश’पूर्ण खेळी
Advertisement

बटलरच्या एका खेळीने सामन्याचा नूरच पालटला : धमाकेदार खेळीचे दिग्गज खेळाडूंकडून कौतुक

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

वर्षागणिक क्रिकेटचे स्वरुप बदलत चालले आहे. गोलंदाजांच वर्चस्व असलेला खेळ आता फलंदाजांच्या पारड्यात झुकायला लागलंय. त्यातील काही इनिंग स्पेशल असतात. मंगळवारी आयपीएलमध्ये अशीच थरारक, रोमांचक इनिंग कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर पहायला मिळाली. संघातील खेळाडूच काय तर खुद्द प्रेक्षकांनी देखील पराभव स्विकारला असताना मैदानात एका योद्धासारखा उभा राहिला तो जोस बटलर. सलामीला आलेल्या बटलरने वादळी खेळी करत आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवून दिली अन् राजस्थान रॉयल्सला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बटलरच्या या धमाकेदार खेळीच्या अनेक दिग्गज माजी खेळाडूंनी कौतुक केले.

Advertisement

कोलकाताकडून सलामीवीर सुनील नरेनने शतकी खेळी केली. नरेनच्या फलंदीजीच्या जोरावर केकेआरने 20 षटकात 223 धावा केल्या. नरेनने राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. एकीकडे नरेन धुलाई करत असताना दुसरीकडे त्याला केकेआरच्या इतर फलंदाजांची साथ मात्र मिळाली नाही. यामुळे केकेआरला हैदराबादसारखी मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. अर्थात 223 धावांचे टार्गेट ही काही सोपी गोष्ट नाही, हे तितकेच खरे आहे. विजयासाठी डोंगराऐवढं आव्हान असताना सलामीला आलेल्या बटलरने सामन्याचा नूर ओळखला अन् शांततेत सुरुवात केली. खेळपट्टीचे स्वरुप पाहिल्यानंतर बटलरला थोडा अंदाज आला होता. समोर ना यशस्वी जैस्वाल, ना संजू... ना रियान..चालला. हेतमायर आला अन् गेला. पॉवेलने कॅरिबियन पॉवर दाखवली खरी पण नरेनने त्याला बाद केले अन् सामन्याचं पारडं फिरवलं. पॉवेल गेला...आता संपलं असं वाटू लागलं. पण चार ओव्हर बाकी असतानाच बटलरने श्रेयसला धडकी भरवली.

राजस्थानला 15 चेंडूमध्ये 38 धावांची गरज होती, हातात फक्त दोन विकेट होत्या. बटलरने एकट्यानेच 15 चेंडू खेळून राजस्थानला विजय मिळवून दिला. त्याने 60 चेंडूमध्ये नाबाद 107 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये बटलरने 6 षटकार आणि 9 चौकार ठोकले. विशेष म्हणजे, अखेरचा रन निघेपर्यंत बटलर मैदानात टिकला अन् जिंकला सुद्धा...! बटलरच्या या धमाकेदार खेळीनंतर राजस्थानने हारलेला सामना जिंकला. यानंतर मैदानात खेळाडूंनी केलेला जल्लोष पाहण्यासारखा होता.

संयमी खेळी हेच यशाचे गमक

स्वत: वर विश्वास ठेवा, हीच खरी यशाची गुरुकिल्ली होती. मी लयीसाठी धडपडत होतो. सुरुवातीला मी निराश होतो पण त्यानंतर मी स्वत: लाच म्हटले की ठीक आहे. फक्त खेळत राहा तुला नक्कीच गती मिळेल. यानंतर मी फक्त शांत राहण्याचा प्रयत्न केला. धोनी आणि कोहली, ज्या पद्धतीने ते शेवटपर्यंत खेळतात आणि मीही तेच करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, संगकाराने मला हे खूपदा सांगितले आहे. नेहमीच एक वेळ येते जेव्हा गोष्टी बदलतात. तू फक्त विकेटवर उभे राहा, खेळ आपोआप बदलेल. याच गोष्टीचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत असल्यचे बटलरने शेवटी सांगितले.

Advertisement
Tags :

.