For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बटलरला दुखापतीने सामना हुकणार

06:22 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बटलरला दुखापतीने सामना हुकणार
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी-20 ब्लास्ट क्रिकेट स्पर्धेत लँकेशायर संघाकडून खेळणारा इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला दुखापतीच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने बुधवारी या स्पर्धेतील होणाऱ्या ससेक्स विरुद्धच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्याला मुकावे लागत आहे.

या दुखापतीमुळे 11 सप्टेंबरपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाबरोबरच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत बटलरच्या सहभागाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. बटलरची ही दुखापत बरी होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाबरोबर होणाऱ्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेवेळी उपलब्ध राहिल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Advertisement

बटलर दुखापतीमुळे या आगामी टी-20 मालिकेत खेळू शकला नाही तर सॅम करन आणि फिल सॉल्ट हे कप्तानपदासाठी आघाडीवर आहेत. गेल्या जूनमध्ये झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात बटलरचा समावेश होता. मात्र्घ् यासामन्यानतंर त्याला वारंवार दुखापतीच्या समस्येने चांगलेच त्रासले आहे.

Advertisement
Tags :

.