कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बस लुटमार प्रकरणाचा छडा

01:52 PM Aug 30, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सातारा, उंब्रज :

Advertisement

पुणे बेंगलोर महामार्गावर वराडे (ता. कराड) येथे पहाटेच्या सुमारास एसटी बस मधील कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून 92 तोळ्याचे दागिने व 32 हजार रुपये रोख असलेली बॅग जबरीने चोरण्यात आली होती. या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. या प्रकरणात चार आरोपी अटक केले असून त्यांच्याकडून दागिने, रोख रक्कम तसेच गुह्यात वापरलेली गाडी असा 76 लाख 94 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Advertisement

याप्रकरणी राहुल दिनेश शिंगाडे (रा. शिंगणापूर ता. माण), महावीर हनुपंत कोळपे (रा. बिबी ता. फलटण), अभिजीत महादेव करे (रा. रावडी ता. फलटण), अतुल महादेव काळे (रा. भांब ता. माळशिरस) या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. तसेच या गुह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर गाडी सुद्धा जप्त झाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, पोलीस हवालदार हसन तडवी, मनोज जाधव, प्रवीण कांबळे, प्रवीण पवार या पथकाने फिर्यादीची संपूर्ण माहिती घेऊन त्या पद्धतीने तपास सुरू केला. शिंगाडे व कोळपे यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता आरोपी महावीर कोळपे हा कृष्णा कुरिअर कोल्हापूर येथे नोकरीस होता. त्याला कुरिअर कंपनीचा कर्मचारी सोन्याचे दागिने कधी घेऊन जातो हे माहीत होते. तो संदर्भ घेऊन तपास सुरू झाल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. दि. 29 जुलै रोजी आरोपी स्विफ्ट डिझायर गाडीतून कोल्हापूर येथे गेले होते. तेथे बसस्थानकावर थांबून साडेनऊच्या सुमारास रात्री त्यांनी कोल्हापूर मुंबई बसचा पाठलाग केला. बसमध्ये एक फरारी आरोपी बसला होता. एसटी वराडे गावच्या हद्दीत पोहोचली असता फरारी आरोपीने इतरांना इशारा केला. त्यावेळी राहुल शिंगाडे व अतुल काळे यांनी कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्या जवळील सोन्याची बॅग व रोख रक्कम झटापट करून लांबवली.

उर्वरित आरोपींच्या संदर्भाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत तपास पुढे सरकवण्यात आला. अतुल काळे व अभिजीत करे हे खुटबाव (ता. माण) पासून माळशिरस गावाच्या हद्दीतील भांब परिसरातील भालधोंडीच्या जंगलात लपून बसल्याची माहिती प्राप्त झाली. या जंगलाचा तपास पथकाने ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने सर्वेक्षण केले व आरोपींचा ठावठिकाणा समजून घेतला. दि. 24 ऑगस्ट रोजी पोलिसांनी त्यांचे स्थळ निश्चित करून 25 रोजी जंगलातून पायी चालत येत असताना आरोपींना घटनास्थळी जाऊन अटक केली.

आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पथकाने त्यांना चारी बाजूने घेरून ताब्यात घेतले. नमूद आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी अतुल काळे याने घराजवळील उकिरड्यांमध्ये लपवून ठेवलेले 92 तोळे दागिने व सोन्याची बिस्किटे पोलिसांना तपासात सुपूर्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास परितोष दातिर करत आहेत.

या कारवाईमध्ये सपोनि रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस अमलदार साबीर मुल्ला, मनोज जाधव, प्रवीण कांबळे, अजय जाधव, अमित झेंडे, प्रवीण पवार, संकेत निकम, अमृत कर्पे, विजय निकम, दलजीत जगदाळे, आनंदा भोई यांनी सहभाग घेतला होता. या पथकाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article