महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

औद्योगिक क्षेत्रातील बसचालकांची ‘अल्कोमीटर’ चाचणी करावी

11:17 AM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाहतूक पोलिसांचा औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनांना आदेश : ट्रक चालकांचीही चाचणी बंधनकारक

Advertisement

पणजी : भरपूर दारू ढोसून वाहने चालविण्याच्या प्रवृत्तीतून निष्पापांचे बळी घेण्याच्या प्रकारांमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यातुनच गत शनिवारी वेर्णा औद्योगिक वसाहत परिसरात एका बेजबाबदार बसचालकाने भीषण अपघात घडवून क्षणात चौघांचे बळी घेतले. त्या घटनेनंतर आता गोवा पोलिसांनी राज्यातील औद्योगिक वसाहतीतील सर्व कंपन्यांना सक्त निर्देश दिले आहेत. राज्यात 11 औद्योगिक वसाहती असून तेथील कंपन्यांनी स्वत:च्या कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी बसेस नियुक्त केल्या आहेत. मात्र त्यांचे चालक-वाहक कशा स्थितीत सेवा बजावतात, त्यापैकी एखादा मद्यपान वगैरे करून ड्युटीवर येत आहे का? याची शहानिशा, तपासणी कधी होतच नाही. सर्व काही विश्वासावर चाललेले असते. त्यामुळे सर्वच आलबेलही असते. वेर्णा येथील घटनेनंतर वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमधील अनेक कंपन्यांना भेट दिली. त्यावेळी कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांची अल्कोमीटर चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मालवाहतूक करण्राया ट्रक चालकांचीही अल्कोमीटर चाचणी घेणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले अल्कोमीटर कीट खरेदी करण्याच्या सूचनाही यावेळी वाहतूक अधिकाऱ्यांनी सदर कंपन्यांना दिल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article