कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बसचालक मोबाईलवर ; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

05:39 PM Apr 07, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कुर्डुवाडी :

Advertisement

एसटी महामंडळाचे नियम धाब्यावर ठेऊन एसटी बसचा चालक चक्क मोबाइलवर बोलत प्रवासी घेऊन वाहन चालवत आहे. याचा व्हिडिओ सोशलमिडियावर व्हायरल झाला असून यामुळे प्रवास्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement

७ एप्रिल रोजी लातुर -पुणे एसटी ( एम एच ४० वाय ५७८७) बसचा चालक बार्शी - कुर्डुवाडी दरम्यान प्रवाशांच्या  जिवाशी खेळत मोबाइलवर बोलत गाडी चालवत असल्याचा व्हिडिओ त्याच एसटी बसमध्ये बसलेल्या प्रवाशाने काढला आहे.

https://www.tarunbharat.com/wp-content/uploads/2025/04/WhatsApp-Video-2025-04-07-at-5.28.05-PM.mp4

दररोजच्या एसटी प्रवासात एसटीच्या चालक वाहकांचा प्रवाशांशी उद्धटपणा आम्ही अनुभवतो जाब विचारावा तर उलट सरकारी कामात अडथळा या कलमाखाली खोट्या केसेस ही प्रवाश्यांवर होतात गाडी चालवत फ़ोन वर बोलत असणाऱ्या चालकामुळे एसटीमधील प्रवाश्यांचे प्राण धोक्यात येवू शकतात आशा निष्काळजी चालकावर कारवाई झालीच पाहिजे. 
                                                                                                            प्रा. डॉ. आशिष रजपूत

चालकाने मोबाइल जवळ ठेवायचाच नसतो. फार अर्जंट असे काही असल्यास गाडी बाजूला घेऊन बोलायचे असते. गाडी चालवताना मोबाइलवर बोलत असेल तर तो माझ्या दृष्टीने गुन्हाच आहे.सदर व्हिडिओ पाहून कारवाई केली जाईल. 

                                                                                        संजय वायदंडे( एटीएस इंदापूर बस स्थानक)

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article