बसचालक मोबाईलवर ; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कुर्डुवाडी :
एसटी महामंडळाचे नियम धाब्यावर ठेऊन एसटी बसचा चालक चक्क मोबाइलवर बोलत प्रवासी घेऊन वाहन चालवत आहे. याचा व्हिडिओ सोशलमिडियावर व्हायरल झाला असून यामुळे प्रवास्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
७ एप्रिल रोजी लातुर -पुणे एसटी ( एम एच ४० वाय ५७८७) बसचा चालक बार्शी - कुर्डुवाडी दरम्यान प्रवाशांच्या जिवाशी खेळत मोबाइलवर बोलत गाडी चालवत असल्याचा व्हिडिओ त्याच एसटी बसमध्ये बसलेल्या प्रवाशाने काढला आहे.
दररोजच्या एसटी प्रवासात एसटीच्या चालक वाहकांचा प्रवाशांशी उद्धटपणा आम्ही अनुभवतो जाब विचारावा तर उलट सरकारी कामात अडथळा या कलमाखाली खोट्या केसेस ही प्रवाश्यांवर होतात गाडी चालवत फ़ोन वर बोलत असणाऱ्या चालकामुळे एसटीमधील प्रवाश्यांचे प्राण धोक्यात येवू शकतात आशा निष्काळजी चालकावर कारवाई झालीच पाहिजे.
प्रा. डॉ. आशिष रजपूत
चालकाने मोबाइल जवळ ठेवायचाच नसतो. फार अर्जंट असे काही असल्यास गाडी बाजूला घेऊन बोलायचे असते. गाडी चालवताना मोबाइलवर बोलत असेल तर तो माझ्या दृष्टीने गुन्हाच आहे.सदर व्हिडिओ पाहून कारवाई केली जाईल.
संजय वायदंडे( एटीएस इंदापूर बस स्थानक)