महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कणबर्गी, मुचंडी परिसरात गवतगंज्यांना आग लावण्याचा प्रकार सुरूच

09:58 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गुरुवारी रात्री दोन गवत गंज्यांना आग, शेतकऱ्यांतून तीव्र संताप

Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

कणबर्गी, मुचंडी परिसरात गवतगंज्यांना आग लावण्याचा प्रकार सुरूच असून गुरुवारी रात्री कणबर्गी येथेही दोन गवत गंज्यांना आग लावण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कणबर्गी येथील शेतकरी जोतिबा कंग्राळकर यांच्या गवतगंजीला आग लावून शेजारील वाटाणा, मोहरी कडधान्य पिकांचे नुकसान करण्यात आले आहे. तर तेथून काही अंतरावर असलेल्या अप्पया गोवेकर यांच्या गवतगंजीलाही समाजकंटकांनी आग लावली आहे. गुरुवारी रात्री मुचंडी येथेही समाजकंटकांनी सात गवतगंज्या पेटवून दिल्याची घटना घडली होती. त्यामुळे शेतकरीवर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article