महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

औदुंबर येथे मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक! शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज

02:54 PM Dec 05, 2023 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

भिलवडी वार्ताहर

Advertisement

औदुंबर येथे मिनी ट्रॅव्हल्स अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली असून,लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisement

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास श्री क्षेत्र औदुंबर येथे नाशिकहून आलेली मिनी ट्रॅव्हल्स क्र.एम एच ५ ए झेड ५५८३ स्वयंभू गणपती जवळील चिंचेच्या झाडाखाली लावली होती.रात्री चालक गाडीमध्ये झोपीला असताना रात्री अचानक पणे एक ते दोनच्या दरम्यान अचानक गाडीच्या पुढील बाजूस आग लागली.क्षणार्धात हि आग वाढत गेली.याची जाणीव होताच चालक जागा झाला व गाडीतून खाली उतरुन स्थानिक लोकांना जागे करून,याची माहिती दिली.त्यानंतर स्थानिक नागरिकांनी बोअरवेलच्या पाण्याने सदर आग विझवून आटोक्यात आणली परंतू तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती.गाडीचे पुढील टायर या आगीमध्ये फुटले असून, गाडीतील बैठक व्यवस्था व कागदपत्रे ही जळून खाक झाली होती.यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.सदर आग ही गाडीतील वायरिंगच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.या परिसरामध्ये मिठाई,खेळणी, हॉटेल अशा विविध व्यवसायाच्या टपऱ्या असून, सुदैवाने यांना कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

Advertisement
Next Article