Sangli : कुपवाडमध्ये घरफोडी; दुचाकी आणि लॅपटॉप असा ६० हजारांचा ऐवज चोरीला
कृष्णा हाऊसिंग सोसायटीत चोरट्यांचा धुमाकूळ
कुपवाड : कुपवाड शहरातील कृष्णा हाऊसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या सचिन महादेव घाटे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी व २० हजार रुपयांचा लॅपटॉप, असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली असून पोलिसांनी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन घाटे हे रविवारी व सोम-बारी, असे दोन दिवस घराला कुलूप ला वून बाहेरगावी गेले होते. या कालावधीतचोरट्यांनी पाळत ठेवून घाटे यांच्या घराचे कुलूप तोडले. दरम्यान, चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.१०, डी. पी.५७२३) व २० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप, असा एकूण ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत घाटे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.