महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरासह परिसरात चोऱ्या-घरफोड्यांचे सत्र सुरूच

11:56 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चेनस्नॅचिंगसह वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यात पोलिसांना अपयश : पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरातील वाढत्या चोऱ्या, घरफोड्या रोखण्यात पोलीस दलाला अपयश आले आहे. खास करून एका माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चोऱ्या नित्याच्याच झाल्या असून चोऱ्यांच्या सत्रामुळे पोलीस यंत्रणा पुरती हैराण झाली आहे. पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे. घरफोड्या, चेनस्नॅचिंगच्या घटना वाढल्या आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही या प्रयत्नांना यश आले नाही. चोऱ्यांच्या सत्रामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारांना आवर घालण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे.

Advertisement

सलग तीन दिवस घरफोड्या घडल्या आहेत. त्याआधीही घरफोड्या व चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी महांतेशनगर येथील गणेश मंदिराजवळील ज्योती मरकट्टी यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून पावणे दोन लाखांचे दागिने पळविण्यात आले आहेत. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी श्रीनगर उद्यानाजवळ चोरी झाली आहे. सय्यद यास्मीन यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे दहा लाखांचे दागिने पळविले आहेत. सोमवारी 26 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. या घटनेपाठोपाठ मंगळवार दि. 27 ऑगस्ट रोजी महांतेशनगर येथील डॉ. विजय निडगुंदी यांचे घर फोडून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. घरात कोणी नसताना सेक्टर क्र. 11 मध्ये ही घटना घडली.

दि. 16 ऑगस्ट रोजी श्रावण शुक्रवारानिमित्त होणाऱ्या वरदमहालक्ष्मी पूजेसाठी गेलेल्या दोन महिलांचे मंगळसूत्र पळविल्याच्या घटना घडल्या आहेत. शाहूनगर येथील सुमा मत्तीकल्ली यांच्या गळ्यातील 25 ग्रॅमचे मंगळसूत्र व कमलदीप शिलवंत या महिलेचे 15 ग्रॅमचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी पळविले आहे. या सर्व घटनांची माळमारुती पोलीस स्थानकात नोंद झाली आहे. चेनस्नॅचिंग प्रकरणातील गुन्हेगारांसह काही प्रकरणात गुन्हेगारांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हेगारांची छायाचित्रे प्रसिद्धही केली आहेत. मात्र, एकाही प्रकरणात गुन्हेगारांविषयी ठोस माहिती मिळाली नाही. चेनस्नॅचिंग प्रकरणातील आरोपी कोल्हापूरच्या दिशेने पळाले आहेत, अशी माहिती मिळाल्यामुळे माळमारुती पोलिसांचे एक पथक कोल्हापूरला गेले होते. मात्र, अधिकाऱ्यांना गुन्हेगारांविषयीची माहिती मिळाली नाही.

भरपावसातही चोऱ्या, घरफोड्या 

भरपावसातही चोऱ्या, घरफोड्या थांबल्या नाहीत. केवळ माळमारुतीच नव्हे तर शहरातील इतर पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातही गुन्हे सुरूच आहेत. 21 ऑगस्ट रोजी मार्केट यार्डमधील दोन अडत दुकानात घुसून दोघा जणांनी भरदिवसा ड्रॉवरमधील रोकड पळविल्याच्या घटना घडल्या आहेत. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात या घटना घडल्या आहेत. तर 17 ऑगस्ट रोजी खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या शुभांगी नेसरकर या महिलेच्या बॅगेतील पर्स पळविल्याची घटना पांगुळ गल्ली येथे घडली आहे. मार्केट पोलिसांकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. यापैकी कोणत्याच प्रकरणाचा तपास लागला नाही. एखादी चोरीची घटना घडली की ज्यांच्या घरी चोरी झाली आहे, त्या घरमालकांनाच पोलीस दरडावतात. तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे का बसवले नाहीत? अशी विचारणा करतात. तुमच्या सुरक्षिततेसाठी कॅमेरे बसवा, असा सल्ला देतात. मात्र, ज्या प्रकरणात गुन्हेगारांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, त्यांचा शोध घेणे मात्र पोलीस यंत्रणेला शक्य झाले नाही.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article