महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वडगाव-आनंदनगरमध्ये पुन्हा घरफोडी

11:07 AM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

परिसरातील जनता मात्र भयभीत : चोरट्यावर तलवारीचा वार होऊनही फोडले दुसरे घर

Advertisement

बेळगाव : आम्हाला कसलीच भीती नाही, तुम्ही गस्त घाला, तुम्ही जागरण करा, मात्र आम्ही तुमची घरे फोडून किमती ऐवज लांबविणारच असा श•t चोरट्यांनी ठोकला आहे. वडगाव -आनंदनगर येथे चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून चोरट्यावर तलवारीचा वार झाल्यानंतरही पुन्हा एका घरात चोरी झाल्याने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. या चोरट्यांनी पोलिसांबरोबर जनतेसमोरही आव्हान उभे केले आहे. या प्रकारामुळे आनंदनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आता जागता पहारा करावा लागणार आहे. सोमवारी रात्री चोरट्यांनी तिसरा क्रॉस, आनंदनगर, वडगाव येथील नितेश मुरकुटे यांच्या घरात प्रवेश केला. घराच्या खिडक्या उघड्या होत्या. त्यानंतर हा प्रकार घरी आल्यानंतर नितेशच्या लक्षात आला. घरामध्ये कुणाचे तरी पायाचे ठसे उमटले आहेत. त्यामुळे आपल्या वडिलांना याबाबत विचारणा केली. तुझ्याच पायाचे ठसे असतील असे वडिलांनी नितेशला सांगितले. मात्र, नितेशला संशय आला. एखादा चोरटाच घरात चाचपणी करून गेला असून त्यानेच खिडकीचे दरवाजे उघडे केल्याचा संशय व्यक्त केला. त्यामुळे नितेश हा हातामध्ये तलवार घेऊन खिडकी शेजारीच बसून राहिला. चोरटा बाहेरून आला त्यानंतर त्याने घराची कडी काढण्याचा प्रयत्न केला. आवाज येताच खिडकीमधून नितेश याने त्या चोरट्यावर तलवारीने वार केला. तो वार त्याच्या पायावर बसला. त्यामुळे चोरट्याने पलायन केले. नितेशने दरवाजा काढून त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करण्यासाठी घराचा दरवाजा मात्र घराच्या दरवाजाला बाहेरुन कडी घातल्याने नितेशला बाहेर पडता आले नाही.
Advertisement

बंद घरात चोरी

त्या घटनेनंतरही चोरट्याने त्याच गल्लीतील प्रशांत भातकांडे यांचे बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तत्पूर्वी चोरट्याने समोर असलेल्या लता विठ्ठल सुतार यांच्या घराला कडी लावली. त्यावर एका कापडाने गाठ बांधली. यावेळी समोर असलेल्या शौचालयामध्ये चोरट्याला आवाज आला.  चोरट्याने शौचालयाचा दरवाजा जोराने ढकलण्याच प्रयत्न केला. लता या शौचालयात गेल्या होत्या. त्यांनी आतून दरवाजा दाबून धरला. त्यांच्या लक्षात आले कोणी तरी बाहेर आले आहे. चोरट्याने त्यांना आतच बैस नाही तर बाहेर येशील तर गळा दाबू अशी धमकी दिली. यामुळे घाबरून लता उशीरापर्यंत बाहेर आल्याच नाहीत. त्याचवेळी चोरट्याने समोरच्या प्रशांत भातकांडे यांच्या बंद घरात प्रवेश करून बेडरुममधील चांदीच्या विविध वस्तू आणि रोख 12 हजार रुपये लांबविले. काही उशिरानंतर लता शौचालयाबाहेर पडल्या. त्यांनी चोर चोर म्हणून आरोळी ठोकली. त्याचवेळी चोरट्याने तेथून पलायन केले.

लॉकर्समध्ये सोने ठेवल्याने सुरक्षित

प्रशांत भातकांडे हे पंतबाळेकुंद्री येथील दत्त मंदिरमध्ये सेवा बजावतात. त्यामुळे ते नेहमीप्रमाणे दत्त मंदिराकडे गेले होते. तर त्यांची पत्नी मुंबईला मुलीकडे गेल्या होत्या. त्यांनी सोने लॉकर्समध्ये ठेवले होते. त्यामुळे सुदैवानेच सोने सुरक्षित राहिले आहे. तरी देखील जवळपास 30 हजारहून अधिक रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला आहे. या घडलेल्या घटनेनंतर शहापूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरी देखील तो चोरटा त्याच परिसरात घुटमळत होता, असे येथील नागरिकांनी सांगितले. युवराज मुचंडी यांच्या नजरेला चोरटा पडला होता. त्यामुळे युवराज हे देखील घराबाहेर आले. त्याचवेळी पोलीस देखील दाखल झाले होते. युवराज यांनी पोलिसांना आताच माझ्या नजरेला चोरटा पडला आहे. तेव्हा त्याचा शोध घेतला तर तो सापडू शकतो असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आले आहेत. प्रथम त्यांची भेट घ्या, असे सांगितले. तोपर्यंत चोरटा तेथून पसार झाला.

नागरिकांत भीतीचे वातावरण

आनंदनगर, साई कॉलनी, केशवनगर या परिसरात चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यामध्ये पोलीस अपयशी ठरले आहेत. तर तरुणाने चोरट्यावर तलवारीचा हल्ला केला. तरीही चोरी झाली. यामुळे सर्वत्र भीती पसरली आहे. अशा प्रकारे चोरटे जर चोरी करीत असतील तर आम्ही नेमके करायचे काय? असा प्रश्न आता साऱ्यांनाच पडला आहे. बुधवार दि. 13  डिसेंबर रोजी आनंदनगर दुसरा, तिसरा क्रॉस, साई कॉलनी येथील चार घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लांबविला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवार दि. 14 डिसेंबर रोजी येळ्ळूर रोडवरील केशवनगरमध्ये दोन घरे फोडून किमती ऐवज आणि रोखरक्कम लांबविला आहे. त्यानंतर शुक्रवार दि. 15  डिसेंबर रोजी कनकदास कॉलनी, अनगोळ येथे जवळपास पाच घरे फोडून किमती ऐवज लांबविला आहे. चोरट्यांनी अक्षरश: हैदोस घातला. त्यानंतर पुन्हा सोमवारी रात्री आनंदनगर परिसरातच चोरी झाली आहे. यामुळे पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चोरट्यांची सीसीटीव्ही फुटेज देखील सापडली आहेत. केशवनगर येथील चोरीच्या वेळी चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तर मंगळवारी झालेल्या आनंदनगर येथील चोरीच्या घटनेमध्येही तो चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तरीदेखील अजून चोरटा पोलिसांच्या हाती लागत नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकाराकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टिळकवाडी आणि शहापूर पोलीस हद्दीत अडकले आनंदनगर

चोरीच्या घटनेनंतर शहापूर आणि टिळकवाडी पोलीस एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. हा परिसर आमच्या हद्दीत येत नाही, असे दोन्ही पोलीस स्थानकांचे पोलीस सांगत आहेत. त्यामुळे नेमके आम्ही कोणाकडे तक्रार करायची? तसेच या परिसरात गस्त कोण घालणार? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

टिळकवाडी पोलिसांकडून आवाहन

चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तेव्हा जनतेने सावधानता बाळगावी. घरामध्ये सोन्याचे दागिने तसेच पैसे न ठेवता ते लॉकरमध्ये ठेवावेत. घराचा दरवाजा मजबूतपणे बंद करावा. या परिसरातील मंदिरांमध्येही कुलुप लावावा, सीसीटीव्ही बसून घ्यावेत, असे आवाहन टिळकवाडी पोलिसांनी केले आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेला लॉकरचा खर्च परवडणे अवघड आहे. ते शक्य नाही. तेव्हा टिळकवाडी आणि शहापूर पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

आता तरुणच घालणार गस्त

वाढत्या चोऱ्यांमुळे या परिसरातील जनता हादरली असून आता पोलिसांवर भरवसा न ठेवता आपणच रात्रीची गस्त घालण्याचा निर्णय तरुणांनी घेतला आहे. प्रत्येक भागातील तरुण रात्री जागरण करून काही दिवस गस्त घालण्याचे ठरविले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article