कॉंग्रेसचे खासदार सिंघवी यांच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल
या घटनेनंतर संसदेत गोंधळाचे वातावरण
दिल्ली
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी काल नियमीत तपासणी दरम्यान सभागृहातील कॉंग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिँघवी यांच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल सापडल्याचा दावा केला आहे. या खळबळजनक दाव्यानंतर भाजप-कॉंग्रेस आमने सामने आले असून या प्रकरणी चौकशी करणार असल्याचेही सभापतींनी सांगितले. खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आलेल्या सीट क्रमांक २२२ मधून सापडलेले नोटांचे बंडल तपासासाठी देण्यात आलेले आहे. या दाव्यामुळे कॉंग्रेस पक्ष अडचणीत सापडला असून त्यांच्यावर सगळीकडून टिका होत आहे.
याबद्दल अभिषेक मनु सिंघवी हे या आरोपांवर उत्तर देताना म्हणाले, माझ्याकडे फक्त ५०० रुपये होते. त्या नोटा माझ्या नाहीत. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.
सभागृहात य़ा मुद्यावरून इतर पक्षांनी आक्षेप घेतला आहे. या नोटांची तपासणी सुरु असून संसद भवनातील सी सी टिव्ही चे फुटेज गोळा करण्याचे काम सुरु आहे. या घटनेवर कॉंग्रेस पक्षाने अजून कोणतीही बाजू मांडलेली नाही.
तर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, ही घटना निंदनीय आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. संसद ही देशाच्या लोकशाहीची एक पवित्र जागा आहे. अशा घटनांनी तिची प्रतिमा ढासळते आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर करवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.