महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रोहितच्या अनुपस्थितीत बुमराह करणार नेतृत्व

06:58 AM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तंदुरुस्त राहुल सलामीला येणार

Advertisement

वृत्तसंस्था / पर्थ

Advertisement

कर्णधार रोहित शर्माला पहिली कसोटी मुकणार असून नवजात बाळासोबत वेळ घालवल्यानंतरच तो अॅडलेडमध्ये संघात सामील होणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी सलामीला येण्यास के. एल. राहुल सज्ज झाला असून रविवारी येथे जाळ्यातील सराव सत्रामध्ये सहभागी होऊन त्याने त्याच्या तंदुऊस्तीबद्दलची चिंता दूर केली आणि ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पहिल्या कसोटीत सलामीला येण्याची तयारी दर्शविली. रोहितच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करेल.

वाका मैदानावर संघातर्गत सराव सामन्यात फलंदाजी करताना वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा चेंडू कोपराला लागल्याने राहुलने शुक्रवारी वैद्यकीय उपचारासाठी मैदान सोडले होते. बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेतील पाच कसोटींपैकी पहिली कसोटी 22 नोव्हेंबरपासून ऑप्टस स्टेडियमवर सुरू होणार आहे, तर दुसरी कसोटी अॅडलेड येथे 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. एकंदरित पाहता संघ व्यवस्थापन राहुल व यशस्वी जैस्वाल या जोडीला सलामीस पाठवेल, असे दिसते. शुभमन गिल पहिल्या कसोटीतून अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने बाहेर पडल्यानंतर 32 वर्षीय राहुल वेळेवर तंदुरुस्त झाल्यामुळे संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. राहुलने सरावावेळी बराच वेळ कोणत्याही लक्षणीय अस्वस्थतेशिवाय फलंदाजी केली आणि तीन तास चाललेल्या सत्रातील सर्व प्रकारच्या सरावात भाग घेतला.

मला खेळाच्या पहिल्या दिवशी वाईट तडाखा बसला होता. आता मला बरे वाटत आहे, पहिल्या सामन्यासाठी मी तयार आहे. येथे लवकर येऊन मला परिस्थितीशी जुळवून घेता आले याचा आनंद आहे, असे राहुलने बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. मला या मालिकेच्या तयारीसाठी खूप वेळ मिळाला आहे आणि मी सामोरा जाण्यास उत्सुक आहे, असेही त्याने पुढे म्हटले आहे. खरे तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही मुंबईत प्रस्थानापूर्वीच्या पत्रकार परिषदेत राहुलच्या पदोन्नतीचे संकेत दिले होते. फिजिओ कमलेश जैन यांनी राहुलने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला असल्याचे सांगितले आहे.

कोणतेही फ्रॅक्चर राहणार नाही याची खात्री करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्या आघातानंतर 48 तास झाले आहेत आणि त्याने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. तो आता मैदानात उतरण्यास तयार असला पाहिजे, असे जैन यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. सपोर्ट फिजिओ योगेश परमार यांनी सांगितले आहे की, उपचार वेदना नियंत्रित करण्यावर केंद्रीत राहिलेले आहेत. मी त्याला एक्स-रे तपासणी आणि स्कॅनिंगसाठी घेऊन गेलो होतो आणि अहवाल पाहता तो ठीक होईल याचा मला विश्वास होता. फक्त वेदना नियंत्रित करण्याची आणि त्याला थोडा आत्मविश्वास देण्याची गरज होती. वैद्यकीय दृष्टिकोनातून तो पूर्णपणे ंठीक आहे, असे परमार म्हणाले. भारतीय संघाने रविवारी वाका मैदानावरील सराव पूर्ण केला. पाहुणे आता सोमवारी विश्रांती घेतील अणि मंगळवारपासून ऑप्टस स्टेडियवर सामन्याच्या सरावासाठी रवाना होतील.

देवदत्त पडिक्कल, तीन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियातच राहणार

दरम्यान, भारतीय संघ व्यवस्थापनाने अव्वल फळीतील फलंदाज देवदत्त पडिक्कलला भारत ‘अ’ संघातील तीन वेगवान गोलंदाजांसह ‘बॅटिंग बॅकअप’ म्हणून ऑस्ट्रेलियात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवदत्त हा अलीकडेच ऑस्ट्रेलिया ‘अ’विरुद्ध दोन चार दिवसीय सामने खेळलेल्या भारत ‘अ’चा भाग होता. अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी कर्नाटकच्या संघात स्थान मिळालेल्या या डावखुऱ्याने ’अ’ संघाच्या दौऱ्यात 36, 88, 26 आणि 1 अशा धावा केल्या. तीन वेगवान गोलंदाज मुकेश कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी हेही भारत ‘अ’ संघाचा भाग होते. सैनी मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटीत खेळला होता. आजपर्यंत तो केवळ दोन कसोटी सामने खेळलेला आहे. ‘पण ते अलीकडे येथे खेळले आहेत. म्हणून ऑस्ट्रेलियन परिस्थितीशी परिचित आहेत’, असे त्यांना ऑस्ट्रेलियातच ठेवण्याच्या निर्णयाविषयी बोलताना एका सूत्राने सांगितले. ‘जसप्रीत बुमराहचा नेटमध्ये सामना करताना देवदत्त अत्यंत प्रभावी दिसला आणि व्यवस्थापनाने ते देखील विचारात घेतले आहे’, असे या सूत्राने सांगितले. या 24 वर्षीय खेळाडूने या वर्षाच्या सुऊवातीला धर्मशाला येथे झालेल्या इंग्लंडविऊद्धच्या कसोटीत पदार्पण केले होते आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 65 धावा केल्या होत्या.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article