For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौथ्या कसोटीत बुमराहला विश्रांतीची शक्यता

06:50 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
चौथ्या कसोटीत बुमराहला विश्रांतीची शक्यता
Advertisement

के. एल. राहुल दुखापतीतून सावरल्याने पुनरागमनाच्या तयारीत

Advertisement

वृत्तसंस्था/ राजकोट

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला रांची येथे 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविऊद्धच्या चौथ्या कसोटीत विश्रांती दिली जाण्याची, तर फलंदाज के. एल. राहुल दुखापतीतून ठीक झालेला असल्याने पुनरागमन करण्याची शक्यता आहे. बुमराह पाच सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत 17 बळी घेऊन आघाडीवर आहे आणि दुसऱ्या कसोटीत तर त्याने एकट्याने प्रभावी मारा करत भारताला विजय मिळवून दिला. पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या यजमान 2-1 ने आघाडीवर आहेत.

Advertisement

संघ आज रांचीला जाणार आहे आणि बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे, असे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले. त्याने सांगिले की, राहुल पूर्णपणे तंदुरुस्त होण्याच्या जवळ आहे आणि तो रांचीमध्ये खेळणार असलेल्या संघाचा भाग असू शकतो. बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय झाल्यास तो आश्चर्यकारक नाही. कारण त्याने पहिल्या तीन कसोटींमध्ये 80.5 षटके टाकली आहे.

‘वर्कलोड मॅनेजमेंट’चा एक भाग म्हणून भारताने मोहम्मद सिराजला विशाखापट्टणममधील दुसऱ्या कसोटीतून विश्रांती दिली होती आणि तिसऱ्या कसेटीत पुनरागमन करून पाहुण्यांवर भारताने मिळविलेल्या विक्रमी 434 धावांच्या विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली. रांचीमध्ये मालिका जिंकण्याच्या दृष्टीने भारताची स्थिती मजबूत आहे. परंतु जर ते शक्य झाले नाही, तर 7 मार्चपासून धर्मशाला येथे होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी भारताला बुमराहच्या सेवेची नितांत आवश्यकता भासत असेल.

दुखापतीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीला मुकलेला राहुल गेल्या आठवड्यात 90 टक्के तंदुऊस्तीवर पोहोचला होता. तो मॅच फिटनेसच्या स्तरापर्यंत पोहोचला आहे आणि रांची कसोटीसाठी उपलब्ध व्हायला हवा, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये ज्या दुखापतीने त्याला ग्रासले होते त्याच दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्याने त्याला दोन सामने हुकले. त्यापूर्वी हैदराबादमधील पहिल्या कसोटीत राहुल भारताच्या सर्वोत्तम कामगिरी केलेल्या फलंदाजांपैकी एक राहिला होता.

Advertisement
Tags :

.