बेलवडे हवेली येथे बुलेटची ट्रकला धडक; दोघेजण जखमी
जखमींना कराडच्या रुग्णालयात उपचार सुरू
उंब्रज : पुणे बंगलोर आशियाई महामार्गावर बेलवडे हवेली ( ता.कराड ) हद्दीतील राऊ हॉटेल समोर रस्त्याकडेला उभे असणाऱ्या ट्रकला बुलेट स्वाराची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात बुलेटवरील दोघेजण जखमी झाले आहेत. रविवार दि.१२ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
बुलेटवरील राहुल रघुनाथ माने व नमन श्रीकांत माने (राहणार कागल ) हे दोघेजण जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी हायवे ॲम्बुलन्सचे चालक ऋषीकेश खालकर, डॉ.भारव्दाज चव्हाण, यशराज क्रेन सर्व्हिसचे सुनिल कुंभार यांनी तात्काळ धाव घेवून मदत कार्य केले. वाहतूक सुरळीत करुन जखमींना उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार पुणे बंगलोर अशी महामार्गावर बेलवडे हवेली गावच्या हद्दीतील राऊ हॉटेल समोर रस्त्याकडेला ट्रक उभा होता. या ट्रकवर पाठीमागून येणाऱ्या बुलेट्ची धडक बसली. या धडकेत बुलेट वरील दोघेजण जखमी झाले. हि दोघे कोल्हापूर बुलेटवरुन पाल (ता.कराड ) येथे निघाले होते.