महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आंध्रच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्ष कार्यालयावर बुलडोझर

06:31 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगनमोहन रेड्डीचे चंद्राबाबूंवर जोरदार टीकास्त्र

Advertisement

वृत्तसंस्था/ अमरावती

Advertisement

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाचे बांधकाम सुरू असलेले कार्यालय राज्य सरकारने बुलडोझरने पाडले आहे. ही कारवाई आंध्रप्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणाने (सीआरडीए) शनिवारी पहाटे 5:30 वाजता केली. हे कार्यालय गुंटूरच्या ताडेपल्ली येथे 9,365 स्क्वेअर फूटमध्ये बांधले जात होते. यापूर्वी, हैदराबाद महानगरपालिकेने जगनमोहन रेड्डी यांच्या लोटस पॉन्ड निवासस्थानाशेजारील फूटपाथवरील बेकायदेशीर बांधकाम पाडले होते. त्याचा वापर सुरक्षा कर्मचारी करत होते. आंध्रप्रदेशचे नवे मुख्यमंत्री आणि टीडीपी सुप्रीमो चंद्राबाबू नायडू सूडाचे राजकारण करत असून ते हुकूमशहाप्रमाणे वागत असल्याचा आरोप जगनमोहन रेड्डी यांनी केला आहे.

आंध्रातील नायडू यांच्या नेतृत्त्वातील सरकारने वायएसआरसीपीविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. याअंतर्गत विशाखापट्टणम कार्यालयाच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत आणखी एक नोटीस पाठवली आहे. रेड्डी यांनी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी ही कारवाई करण्यात आली. राज्य सरकारी यंत्रणांच्या या कारवाईवर वायएसआरसीपीचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article