महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्यात आता बुलबुल चित्रपट महोत्सव

12:19 PM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आंतरराष्ट्रीय बाल चित्रपटांचे प्रदर्शन : जानेवारीत मडगावात होणार महोत्सव,आतापर्यंत आठ हजार मुलांची नोंदणी,जगभरातील 119 बाल चित्रपटांचा सहभाग

Advertisement

पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), मराठी चित्रपट महोत्सव या धर्तीवर आता राज्यात बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती, परंपरा व मूल्ये ऊजविण्याचा हा प्रयत्न असून, या महोत्सवात कोकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांतील 119 चित्रपट दाखविण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरी येथील मंत्रालयात काल गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत यांनी या महोत्सवाची ऊपरेषा स्पष्ट केली. यावेळी मडगावचे आमदार दिगंबर कामत, भाजपचे जनरल सेक्रेटरी दामोदर नाईक, अंतरंग प्रोडक्शनचे सिद्धेश नाईक आदी उपस्थित होते.

Advertisement

मडगाववासियांसाठी अनोखी भेट

आमदार कामत म्हणाले, गोव्यात प्रथमच पहिला बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित होत असल्याने राज्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी मडगावात हा महोत्सव आयोजन केल्याने त्यांनी ही मडगाववासियांसाठी दिलेली नवीन वर्षातील अनोखी भेट आहे. हा महोत्सव माहिती आणि प्रसिद्धी विभाग, मडगाव रवींद्र भवन आणि अंतरंग प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने  होणार आहे. बुलबुल चिल्ड्रन्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल नावाच्या चित्रपटात जगभरातील बालचित्रपट दाखवले जातील. महोत्सवाचा भाग म्हणून अनेक उपक्रम, कार्यक्रम, स्पर्धा आणि मास्टर क्लासेस आयोजित केले जाणार आहेत, असेही कामत म्हणाले. अंतरंग प्रोडक्शनचे सिद्धेश नाईक म्हणाले, बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवासाठी आतापर्यंत 8 हजार मुलांनी नोंदणी केलेली आहे. या महोत्सवात एकूण 119 चित्रपट दाखविण्याचा प्रयत्न राहणार आहे. यामध्ये शॉर्ट फिल्मचाही समावेश असेल, असे ते म्हणाले. या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी er https://bciffindia.com यावर नोंदणी करावी, असेही ते म्हणाले.

18 वर्षांवरील सहभागींसाठी 200 ऊपये शुल्क

बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवात 18 वर्षांखालील मुलांसाठी मोफत प्रवेश आहे, तर 18 वर्षांवरील सहभागींसाठी पाच दिवसांसाठी 200 ऊपये शुल्क आकारण्यात येतील, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article