For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंदिर तयार होताना...भाग-3

06:25 AM Nov 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
मंदिर तयार होताना   भाग 3
Advertisement

मंदिर तयार होताना बिंदूपासून सुरुवात करायची असं जरी ठरलं तरी मंदिराचे दोन भाग पडतात. एक बाह्य आणि दुसरा अंतरी बिंदूतून आधी बीज पुढे तयार होतं आणि मंदिराचा आकार साकार होतो. या मंदिरात त्रिकोणाला सर्वात जास्त महत्त्व आहे. त्रिकोणसुद्धा दोन प्रकारचे. अधोशीर्ष बिंदू असलेला त्रिकोण तर दुसरा उर्ध्वशीर्ष असलेला त्रिकोण. उर्ध्वशीर्ष असलेला त्रिकोण शिवतत्व म्हणजे पुरुष तत्त्व आपल्याला सांगतो तर अधोशीर्ष असलेला त्रिकोण शक्ती तत्व दाखवतो आणि त्यातूनच वेगवेगळे नाद विस्तारित होत असतात, याची प्रचिती मंदिरातून येते. तिसरं प्रतीक आहे ते श्रीयंत्र उर्फ अधोत्रिकोण. नवता म्हणजे साधारणत: जी

Advertisement

विश्वनिर्मितीसाठी अगदी गरजेची असते. चौथे प्रतीक शंख हे ओंकार स्वरूप नादब्रम्हाचं प्रतीक आपण स्वीकारलेलं असतं. पाचवं सुदर्शन ज्याला आम्ही काल प्रतीक असेही म्हणतो. खरंतर सुदर्शन हे संहार जरी असलं तरी ते उपकारकही असतं. याची प्रचिती मंदिरामधून येते. भगवंताचा गदा प्रहार आमच्यातला अहंकार संपून या सगळ्या गोष्टी संपवत असतो. पद्म विश्व प्रतीक मानलंय. कारण पद्म म्हणजेच कमळ हे अलिप्तता दाखवतं. आमच्याकडचे साधुसंत योगीजन हे कमलपत्राप्रमाणे आहेत. घंटा अनाहत नादाचे हे प्रतीक. ध्यानावस्थेतून परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी मंदिराची आवश्यकता असते. कासव इंद्रिय नियंत्रण असेल तर परमेश्वराची प्राप्ती होते. त्यासाठी मंदिराच्या दारातच या कासवाची जागा आहे. तो जशी आपली इंद्रिय योग्यवेळी आखडून घेतो, तशी अवस्था माणसाचीसुद्धा यावी हेच त्यामागचं धोरण असणार. नाग कालाचे प्रतीक. आपण आपल्याच नादात जगत असतो पण हा काळ अजिबात पाय न वाजवता पुढे पुढे सरकत असतो. म्हणूनच त्याला अनंत असे म्हटले. शिवाच्या गळ्यात याचे अस्तित्व आहे तर गणपतीच्या पोटावरती ज्याला फळीवर बंधना असे आपण म्हणतो तो हा नाग. बुद्धीचा प्रकाशसुद्धा उत्कृष्ट प्रकाशातूनच व्हायला हवा. ज्योती हे आकाशाचे प्रतीक. प्रकाश ज्ञानाचे प्रतीक मानतात. आयत लंब चौकोन जो विटेसारखा स्थिर असतो. या लंब चौकोनालाच पृथ्वीचे प्रतीक म्हणून आम्ही देवळात विठ्ठलाच्या पायाखाली दर्शवतो. वर्तुळ हे जलप्रतीक. पाण्यातले तरंग वर्तुळाकार असतात. अनादी अनंत तत्व हे वर्तुळ पूर्ण झालं की आपल्यामधली समरूपता दर्शवतं. चंद्र मनाचे प्रतीक. वायूचे प्रतीक म्हणून चंचल. सूर्य जगाचा आत्मा. ज्ञानदेव परब्रम्हालाही सूर्य म्हणतात. विश्वरूपदर्शन सहस्त्र सूर्य दर्शनासारखं वाटतं, जे अर्जुनाला सहन होत नाही, असा हा सूर्य. कलश म्हणजे घट. योगशास्त्रात शरीराला घट म्हणतात. अशा या कलशाची स्थापना प्रत्येक पूजेच्या सुरुवातीला असतेच. ही परंपरा सगळ्या धर्मांनी मान्य केली आहे.

कीर्तीमुख शिव मंदिराच्या उंबरठ्यावर ज्या राक्षसाचे मुख आहे तो म्हणजे हा कीर्तीमुख. त्याला हातपाय नाहीत. पद्मपुराणात याची गोष्ट येते. शंकरांनी राक्षस मारण्यासाठी एक असुर सिंह मुख नावाचा महागण तयार केला. त्याला सतत काही न काही काम द्यायला लागायचे. तो कामाचा राक्षस होता. इतर राक्षसांना खाऊन संपवल्यानंतर त्याला आता काहीच काम शिल्लक राहिले नव्हते. तो शंकरांकडे आला आणि विचारू लागला. आता मी काय खाऊ. शंकर प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं की आता स्वत:चेच हातपाय खा. ते खाल्ल्यानंतर तुझं जे रूप राहील त्याला माझ्या देवळात उंबऱ्यावरती कायम स्थान असेल. तोच हा कीर्तीमुख राक्षस.

Advertisement

Advertisement
Tags :

.