महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

टेंगीनकेरा गल्ली येथील ‘ती’ इमारत मंडळालाच द्यावी

09:38 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : टेंगीनकेरा गल्ली येथील व्यायाम शाळा ही सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. माजी आमदार अनिल बेनके यांनी शाळेसाठी ही इमारत त्यावेळी उपलब्ध करून दिली. महानगरपालिकेची इमारत असली तरी व्यायाम शाळा तसेच इतर कार्यक्रम होत असतात. तेव्हा आताही ती इमारत त्या उपक्रमासाठीच आम्हाला उपलब्ध करावी, अशी मागणी राजगुरु युवक संघ टेंगीनकेरा गल्लीच्यावतीने महापौर सविता कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Advertisement

महानगरपालिकेच्या या इमारतीमध्ये व्यायाम शाळा, महिला मंडळ, लहान मुलांच्या स्पर्धा यासह इतर सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या चार वर्षांपासून होत आहेत. मात्र काहीजण याठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या अफवा पसरवून ही इमारत महानगरपालिकेला परत घ्यावी, अशी मागणी द्वेषातून करत आहेत. या इमारतीमुळे या परिसरातील पंचमंडळी, नागरिकांना तसेच महिला मंडळांना मोठा फायदा झाला असून सदर इमारत सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच राखीव ठेवावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

माजी आमदार अनिल बेनके यांनी 2022 ला ही इमारत या मंडळाला दिली होती. तेव्हा त्याचा सारासार विचार करावा आणि या परिसरासाठी ही इमारत उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राजगुरु युवक संघ तसेच टेंगीनकेरा गल्ली व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article