For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर विकासात बिल्डरांचेही योगदान

06:27 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहर विकासात बिल्डरांचेही योगदान
Advertisement

बेळगाव क्रेडाईचा वार्षिकोत्सव उत्साहात

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

क्रेडाई बेळगावचा वार्षिकोत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून क्रेडाई कर्नाटकाचे अध्यक्ष प्रदीप रायकर, मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मागील वर्षभरात क्रेडाईने राबविलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.

Advertisement

प्रदीप रायकर यांनी क्रेडाई बेळगावचे तसेच महिला विंग कौतुक केले. शहराचा विकास हा प्रशासनासोबत बिल्डरांकडूनही केला जातो. त्यामुळे बिल्डरना विसरून चालणार नाही. बिल्डींगच्या उंचीबाबतचा प्रश्न उद्भवला असून प्रशासनासोबत चर्चा करून याबाबत योग्य तोडगा लवकरच निघेल, असे त्यांनी सांगितले. मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांनी क्रेडाईच्या उपक्रमांना महानगरपालिकेच्यावतीने सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी गोल्ड प्लस फ्लोट ग्लासच्या शीतल खन्ना, श्रीराम इनोव्हेशनचे सचिन हंगिरगेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. महिला विंगचा आढावा दीपा वांडकर व करुणा हिरेमठ यांनी सादर केला. यावेळी बुडा अधिकारी पी. व्ही. हिरेमठ, क्रेडाईचे माजी राज्याध्यक्ष चैतन्य कुलकर्णी, राजेंद्र मुतगेकर, युवराज हुलजी, प्रशांत वांडकर यासह क्रेडाईचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.