For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आगरवाडेकरांना घर बांधून द्या

12:18 PM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आगरवाडेकरांना घर बांधून द्या
Advertisement

आमदार मायकल लोबो यांची मागणी

Advertisement

म्हापसा : आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर ज्याने पाडले, त्यानेच घर पुन्हा बांधून द्यावे अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोललो असून मुख्यमंत्र्यांनी सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला असल्याचे लोबो म्हणाले.  गोव्याबाहेरील खास करून दिल्ली, हरियाणा, बेंगळूर, मुंबई आदी शहरातील व्यावसायिक गोव्यात येऊन येथील जमिनी विकत घेतात. नंतर गोमंतकीयांनाच धमकावून बेघर करतात. असाच प्रकार आगरवाडेकर कुटुंबीयांबाबत घडला असून त्यांना कोणतीही पूर्व कल्पना न देता वा नोटीस न बजावता घरात घुसून प्रदीप आगरवाडेकर व त्यांच्या मुलाचे अपहरण करून त्यांचे राहते घर जमिनदोस्त करण्यात आले आहे. हे आपण कदापि सहन करणार नाही, असेही लोबो म्हणाले. मंगळवारी सकाळी आमदार मायकल लोबो, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांच्यासमवेत आगरवाडेकर पुटुंबीयांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच हनुमन नाईक तसेच आगरवाडेकर कुटुंबीय उपस्थित होते. पोलिसांनी कंत्राटदाराला घर पाडण्यास मदत केल्याचा आरोप यावेळी आमदार लोबो यांनी केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.