For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोटारसायकलसोबत म्हैस पळविण्याची शर्यत उत्साहात

10:20 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोटारसायकलसोबत म्हैस पळविण्याची शर्यत उत्साहात
Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

येथील भुजंगप्रेमी युवक मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून मोटारसायकलसोबत म्हैस पळवण्याच्या शर्यतीला रविवारी दुपारी चारच्या सुमाराला प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम होते. उद्घाटन समारंभाला ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, माजी सदस्य रामा कदम, नेहाल जाधव, शशीकांत जाधव, राकेश बांदिवडेकर, विनोद कोळी, सुरज होनगेकर, संजय मेनसे, राजू कणबरकर, विशाल हांडे उपस्थित होते. स्वागत ज्योतिबा लाळगे, प्रीयेश पावशे, उदय कदम यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन, दीपप्रज्वलन तसेच शर्यतीचे उद्घाटन फीत कापून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्रीफळ वाढवून शर्यतीचा शुभारंभ करण्यात आला. शर्यतीसाठी बेळगाव तालुक्यातील मोठा गट, मध्यम गट आणि लहान गटांमध्ये अनेक म्हशी, रेडकू घेऊन गवळी लोकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत ही शर्यत सुरू होती. या शर्यतीचे टाईम किपर म्हणून एकनाथ मरूचे यांनी काम पाहिले. एन. ओ. चौगुले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.