For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

31 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

07:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
31 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
Advertisement

1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत असून सरकार 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुऊवात होईल. हे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 फेब्रुवारीपर्यंत चालण्याची शक्मयता आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होऊन 9 फेब्रुवारीपर्यंत चालण्याची शक्मयता आहे. यंदा सार्वत्रिक निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याऐवजी केवळ लेखानुदान मांडले जाणार आहे. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा 10 मार्च रोजी झाली होती. त्यानंतर 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली होती. यंदाही सर्वसाधारणपणे त्याच तारखांच्या मानाने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.