महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्याचा अर्थसंकल्प 8 रोजी

10:46 AM Jan 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे अधिवेशनाला 6 रोजी ’सुट्टी’

Advertisement

पणजी : राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दि. 2 ते 10 फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे. त्यात दि. 8 रोजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत 2024-25 वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, दि. 6 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर येत असल्याने त्या दिवशी विधानसभा कामकाज होणार नाही. गुऊवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर सभापती रमेश तवडकर यांनी ही माहिती दिली. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे रद्द करण्यात आलेले अधिवेशनाचे कामकाज दि. 10 रोजी करण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रश्नोत्तर, शून्य प्रहर आणि अन्य कामकाज त्या दिवशी होणार आहे. अधिवेशनाच्या कामकाजाचे दिवस वाढविण्यासंबंधी विरोधी आमदारांनी  केलेल्या मागणीबद्दल विचारले असता, विरोधकांकडून तशी मागणी होणे स्वाभाविक असल्याचे सभापती म्हणाले. दीर्घकालीन अधिवेशन घेतल्यास शेवटचे काही दिवस अगदीच संथगतीने कामकाज चालते, हा आजवरचा अनुभव लक्षात घेऊनच मोजक्याच दिवसांचे कामकाज करण्याचे ठरविण्यात आले आहे, असेही तवडकर यांनी सांगितले. सध्या रोज 15 अतारांकित प्रश्नांची उत्तरे सरकारकडून देण्यात येत आहेत. मात्र हे प्रमाण 25 पर्यंत वाढवावे, अशी मागणी विरोधी आमदारांनी केली आहे. तसेच रोजचे प्रश्न आणि उत्तरे 48 तासांआधी आमदारांना मिळतील, अशी व्यवस्था करावी, अशी मागणीही आमदारांनी केली आहे.

Advertisement

अर्थसंकल्प अंत्योदय तत्त्वावर आधारित : मुख्यमंत्री

अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत दि. 8 रोजी 2024-25 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा लोकसभा निवडणूक होत असल्याने या अर्थसंकल्पास वेगळेच महत्त्व येणार आहे. त्याद्वारे विविध कल्याणकारी योजना आणि सवलतींच्या माध्यमातून मतदारांना खुश करण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्वत: मुख्यमंत्र्यांनीही तसेच संकेत दिले असून अर्थसंकल्प अंत्योदय तत्त्वावर आधारित असेल, असे ते म्हणाले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article